ताज्याघडामोडी

मराठा समाजासाठी राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

       मराठा आरक्षणाला स्थगिती असल्याने मराठा उमेदवारांना शैक्षणिक आणि सेवाभरतीमध्ये केंद्र सरकारच्या EWS आरक्षणाचा लाभ देण्याचा राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय़ घेतला आहे.

        मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यामुळे मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास गटातून (EWS) लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पण याआधी ही याबाबत मराठा समाजाने विरोध दर्शवला होता.

        अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, मागासवर्गीय प्रवर्गात येणाऱ्या जातीजमातींसाठी सरकारी नोकरी आणि शिक्षणात आरक्षणाची तरतूद आहे. पण विमुक्त जमाती, भाषिक अल्पसंख्यांक, विशेष मागास वर्गीय (SBC) तसंच सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसारख्या काही घटकांना विशेष आरक्षण मिळू शकतं. त्याविषयी प्रत्येक राज्यात वेगवेगळे नियम आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *