ताज्याघडामोडी

टोल न दिल्याने त्या गुंडावर दाखल होणार खंडणीचा गुन्हा 

उर्से टोलनाका येथे  नाक्यावर टोल न भरता वाहने घेऊन गेल्याने मारणे व साथीदारांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याबाबत कारवाईचे आदेश दिले आहेत.

  १५ फेब्रुवारी रोजी तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून वाहनांचा ताफा घेऊन जात असताना गजा मारणे व त्याच्या साथीदारांनी दहशत माजविली होती.  याप्रकरणी ३३ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र गजा मारणे फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, पोलिसांनी टोलनाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पाहणी केली. यात मारणे व त्याच्या साथीदारांनी टोल न देता वाहने गेल्याचे आढळून आले. त्यामुळे याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *