Uncategorized

आवे येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त अभिवादन 

समाजामध्ये अज्ञान अंधश्रद्धा व अस्पृश्यता व अस्वच्छता अनिष्ठ रुठी परंपरा संपवण्यासाठी जीवनभर कार्य केले जातिभेदाविरुद्ध लढा उभा करून शाळा धर्मशाळा नदीवरील घाट बांधण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले असे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची आज 145 वा वी जयंती आवे येथे संपन्न झाली.अज्ञान अंधश्रद्धा,अस्वच्छता,अनिष्ठ रुठी परंपरा विरोधात लढा सुरूच ठेवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. 
राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेलापुष्पहार अर्पण करून गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला असे भजन करून जयंती साजरी करण्यात आली.गणेश दादा ननवरे मित्र मंडळाच्या वतीने शिवाजी चौकात व ग्रामपंचायत च्या वतीने ग्रामपंचायत मध्ये साजरी करणात आली.

यावेळी आवे सोसायटीचे माजी चेअरमन राणू पाटील, माजी उपसरपंच भारत कांबळे,सुखदेव पाटील, पोलिश पाटील दादासाहेबांच कांबळे,जनसेवा विदयार्थी संघटनेचे तालुका अध्यक्ष दिपक पिंजारी,भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस मारुती भुसनर,वंचित आघाडीचे तालुका उपाध्यक्ष नाथा कांबळे,सोसायटीचे माजी संचालक दादासाहेब पाटील,नुतन ग्रामपंचायत सदस्य राणु पाटील ,उमेश माने, ग्रामसेवक माळी भाऊसाहेब, दलित महासंघाचे जिल्हा युवक उपाध्यक्ष संजय नाईकनवरे,परीट समाजाचे तालुका अध्यक्ष गणेश ननवरे, पाडुरंग ढोले,राहुल ननवरे, विष्णु कांबळे,सुभाष कांबळे,अजय ननवरे, विजय ननवरे,मोतीराम बनसोडे,भगवान चौघुले,मुकिंद खताळ आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *