Uncategorized

डीव्हीपी उद्योग समूहाकडून संचारबंदीत पोलीस बांधवांसाठी फराळ आणि जेवणाची व्यवस्था

माघी वारी असल्यामुळे श्री क्षेत्र पंढरपूर व इतर दहा गावांमध्ये संचारबंदी लागू केली होती. त्याअनुषंगाने पंढरपूर येथे बंदोबस्तासाठी जवळपास ३००० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. संचारबंदी मुळे कोणतेही हॉटेल उघडणार नाहीत. यातून पोलिस बांधवांची गैरसोय होऊ शकते म्हणूनच त्यांच्यासाठी डीव्हिपी उद्योग समूहाचे संचालक श्री.अभिजीत पाटील यांच्या माध्यमातून सकाळचा नाश्ता/फराळ, दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण आपल्या तर्फे देण्यात येत आले. त्यामध्ये केळी, पाणी बॉटल खिचडी यांचाही समावेश होता.

कोणताही सण, उत्सव असो आपला परिवार, आपला आनंद-उत्सव बाजूला ठेवून २४/७ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बांधव अव्याहत तत्पर असतात. समाजासाठी त्यांचे कार्य अत्यंत अमुल्य असल्याने त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक प्रयत्न आहे, असे श्री.अभिजित पाटील यांनी यावेळी सांगितले.

त्यावेळी पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.पवार साहेब, सोलापूर ग्रामीण पोलीस निरीक्षक श्री.जाधव साहेब, श्री.गरड साहेब, श्री.आर्किले साहेब, डिव्हीपी उद्योग समूहाचे श्री.अभिजीत कदम, श्री.परवेज मुजावर, श्री.शरद घाडगे, श्री.शरद चव्हाण तसेच इतर पोलीस बांधव होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *