

पंढरपूर शहर हद्दीतील जुन्या दगडी पुलानजीकच्या बंधाऱ्यापासून होणाऱ्या अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाहनावर पंढरपूर शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत महिंद्रा टमटमसह व अर्धब्रास वाळूसह व महिंद्रा कंपनीचा पिकअप असा ४ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सुरज हरि शिंदे वय-21रा.अनवली व समाधान चंद्रकांत शिंदे रा. पंढरपुर यांच्यावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कॉन्स्टेबल सिद्धनाथ मोरे यांनी फिर्याद दाखल केली असून दाखल फिर्यादीनुसार पो.स.ई.गाडेकर यांच्यासह पो.हे.काँ. कदम,पो.काँ.गुटाळ,पो.काँ.माने,पो.कॉ. सिद्धनाथ मोरे, चा.पो.हे.काँ. देडे हे सरकारी वाहनाने चेकींग नाईट राउंड दरम्यान पेट्रोलिंग करीत मध्यरात्री २ चे सुमारास नदीकाठच्या परिसरात आले असता त्यांना सदर दोन्ही वाहनातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक केली जात असल्याचे आढळले.या प्रकरणी भा.दं.वि. कलम 379,34 व खाण खनिज का.क.4 (1),4 (क),(1) 21प्रमाणे पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.