

मागील काही महिन्यात सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील अनेकजण लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाईत सापडले असून आता पुन्हा अशीच एक घटना करमाळा घडली आहे.करमाळा पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून कार्यरत असलेल्या गोरख अप्पा ढाकणे याने तक्रारदारास गुन्हा दाखल करणे कामी २५ हजराची लाच मागितली.या प्रकरणी तडजोडी अंती २० हजार रुपये देण्याचे ठरले.व यातील १० हजार रुपये रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले.
या प्रकरणी पोलीस नाईक गोरख अप्पा ढाकणे याला लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी,पो.ना.प्रमोद पकाले,पो.ना.अतुल घाडगे,पो.ना.अर्चना स्वामी,चा.पो.शि.शाम सुरवसे आदींनी सापळा रचून कारवाई केली आहे.