इचलकरंजी येथील शिवम सहकारी बँकेची आर्थिक स्थिती बिघडल्यामुळे बँकेचा भारतीय रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केल्याने एकच खळबळ उडाली आहे. रिझर्व्ह बँकेने यापूर्वीसुद्धा शिवम बँकेवर आर्थिक निर्बंध लादले होते. बँकेतील 24 कोटी 40 लाखांचा अपहारप्रकरणी काही दिवसांपूर्वीच अध्यक्षांसह 37 जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवाना रद्द झाल्याने जिल्ह्यातील आणखी एका सहकारी बँकेचे अस्तित्व संपुष्टात आले आहे.
