ताज्याघडामोडी

न.पा.स्थायी समितीची आजच्या ऑनलाईन बैठकीबाबत नाराजी

पंढरपुर नगर पालिकेच्या स्थायी समितीची ऑनलाईन बैठक आज सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली असून १० सदस्य असलेल्या या समितीची ऑनलाईन बैठक आयोजित केल्यामुळे अनेक महत्वपूर्ण विषयावर चर्चेस वाव मिळणार नाही अशी नाराजी काही सदस्यांकडून व्यक्त होत आहे.बार्शी नगर पालिकेची सर्वसाधारण सभा थेट सभागृहात नुकतीच पार पडली मग आपल्याकडे केवळ १० सदस्य असलेल्या स्थायी समिती सभेसाठी ऑनलाईनचा आग्रह का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

         आजच्या या ऑनलाईन बैठकीत पंढरपुर नगर पालिकेच्या सर्व्हे नंबर १०० मधील कंपोष्ट डेपो येथील प्लास्टिक विल्हेवाट लावण्याबाबत सोशल लॅब एन्व्हायर्मेंटल सोल्युशन या औरंगाबाद येथील काम करण्याची व बिल अदा करण्यास कार्योत्तर मंजुरी देणे.    कंपोष्ट डेपो येथील ओल्या खताच्या विक्रीचे दर ठरविणे,विविध विभागाच्या कायम तसलमात देणेबाबत मंजुरी देणे,नगर पालिकेच्या विविध विभागाकडून आलेल्या वार्षिक निविदा व इ निविदा विभाग प्रमुख यांच्या शिफारशीवरून मंजूर करणे. मा.अध्यक्ष यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशास मंजुरी देणे,आयत्या वेळच्या ५ विषयांना मंजुरी देणे आदी विषय पत्रिका आजच्या स्थायी समितीच्या ऑनलाईन बैठकीत विषय पटलावर आहे.यातील अनेक विषय महत्वपूर्ण असून सदर सभा ऑनलाईन ऐवजी थेट सभागृहात झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त होताना दिसून येते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *