गुन्हे विश्व

पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीकाठच्या ९ गावातील वाळू साठ्यांच्या लिलाव प्रक्रियेस लवकरच सुरुवात ?

गेल्या जवळपास वर्षभरापासून रखडलेल्या सोलापूर जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया लवकरच सुरु केली जाईल असे संकेत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दोन दिवसापूर्वी दिले होते.वाळू लिलाव रखडल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातून मिळणाऱ्या मोठ्या महसुलावर पाणी सोडावे लागले होते मात्र आता हि लिलाव प्रक्रिया लवकरच सुरु केली जाईल अशी अपेक्षा असतानाच सोलापूर जिल्ह्यातून वाळू घाटांच्या लिलावाद्वारे १५९ कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित असल्याचे दिसून येते.वैधरित्या वाळू उपलब्ध होत नसल्याने अनेक नागिरकांना बांधकामासाठी चोरीच्या वाळूचा पर्याय शोधावा लागला असल्याचे दिसून आले.तर वाळू चोरांना वाळू चोरी करताना ”खूपच खर्च” करावा लागत असल्याने प्रतिब्रास वाळूचे दर अगदी चार आकडी झाले होते.मात्र वाळू लिलाव बंद असल्याने बांधकाम व्यवसायिक आणि बांधकाम कामगार व संलग्न व्यवसायिक यांना मात्र मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत होता.आता जिल्ह्यातील वाळू साठयांच्या सर्वे रिपोर्ट सार्वजनिक करण्यात आला असून यानुसार पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीकाठच्या १५ गावाच्या हद्दीतील वाळू साठ्यांचे लिलाव होतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

पर्यावरण विभागाची मंजुरीची प्रक्रिया अतिशय किचकट असल्याने व वाळू घाटाचा लिलाव घेतलेल्या ठेकेरावर वाळू उपसा करण्याबाबत अनेक नियम व अटी लादल्यामुळे ठेकेदार मोठ्या प्रमाणात अनुत्सुक असल्याचे दिसून आले होते.तर विविध गावाच्या हद्दीतून मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होत असल्याने वाळू चोरी रोखण्यासाठी पोलीस व महसूल खात्याची मात्र मोठी दमछाक होताना दिसून येते.पंढरपूर तालुक्यातील १) शेगाव दुमाला -मुंढेवाडी हद्दीतील ५३ हजार ८३५  ब्रास २) अजनसोंड-मुंढेवाडी ८२ हजार ३५५ ब्रास ३) देगाव -मुंढेवाडी ८३ हजार ९१२ ब्रास ४) चळे २९ हजार ९७७ ब्रास ५) सुस्ते -चळे हद्दीतील ५५ हजार ५८३ ब्रास ६) तारापूर-चळे हद्दीतील ६० हजार ९५४ ब्रास ७) आंबे हद्दीतील २३ हजर २७९ ब्रास ८) विटे -सरकोली हद्दीतील ७२ हजार १७० ब्रास ९) कौठाळी-व्होळे हद्दीतील ४० हजार ७०७ ब्रास वाळू उपलब्ध असलेल्या वाळू घटाचे लिलाव अपेक्षित होते.

जिल्हा महसूल प्रशासनाने मार्च २०२० मध्ये वाळू जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरु केली होती मात्र कोरोना व इतर प्रशासकीय कारणामुळे लिलाव प्रक्रिया रखडली होती.आता लवकरच लिलाव प्रक्रिया सुरु होईल अशी अपेक्षा व्यक्त आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *