ताज्याघडामोडी

पंढरीतील दगडीपुलावरून ऊसतोड कामगारांचा ट्रक भीमा नदी पात्रात कोसळला

धारूर जिल्हा बीड येथून विट्ठल दर्शनासाठी आलेल्या ऊसतोड कामगारांचा ट्रॅक भीमा नदी पात्रात कोसळला असून गुरुवारी दुपारी घडलेल्या या घटनेत दर्शनासाठी आलेले ऊसतोड कामगार भाविक व ट्रक ड्रायव्हर हे येथील दगडी पुलानजीक ट्रक उभा करून देवदर्शनासाठी गेल्याने सुखरूप आहेत.यांच्यासोबत आलेल्या एका कामगाराने मद्य प्राशन केल्याने तो ट्रकजवळच थांबला होता.त्याने ट्रक चालू करून पुढे नेण्याचा प्रयत्न केला असता सदर घटना घडली आहे. 

सदर घटनेची माहिती मिळताच पंढरपूर नगर पालिकेच्या बांधकाम समितीचे सभापती विक्रम शिरसट यांनी धाव घेतली व या बाबत प्रशासनास अवगत केले.सदर ट्रक नदीपात्रातून बाहेर काढण्यासाठी ते आपल्या सहकाऱ्यांसह प्रयत्नशील आहेत 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *