ताज्याघडामोडी

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर हॅकर्सचा डल्ला

नाशिक : केंद्र सरकारच्या धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर हॅकर्सचा डल्ला मारल्याची धक्कादायक बाब नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. एक दोन नव्हे तर तबब्ल 320 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती हॅकर्सनी गायब केली आहे.

विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती गायब झाल्याने शिक्षण विभागात खळबळ माजली आहे. विद्यार्थ्यांच्या नावे रक्कम हडप करणारे कोण आहेत याचा शोध आता सुरु करण्यात आला आहे. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व योजनेअंतर्गत दहा हजार रुपये देण्यात येतात 2014-15 पासून या योजनेच्या अंमलबजावणी सुरू झाली आहे.

यासाठी प्रत्येक शाळेला स्कॉलरशिप पोर्टलवर विद्यार्थ्यांची माहिती भरण्यासाठी लॉगिन आयडी देण्यात येतात. मात्र या शाळांनी विद्यार्थ्यांची माहिती भरलेली नसतानाच ही शिष्यवृत्ती नियमितपणे काढून घेतली जात असल्याचे समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *