गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

५० हजार रुपये दया अन्यथा बारचे स्टॉक रजिस्टर चेक करू

दारूप्रेमी लोकांना उगीचच रस्त्यावरील एखाद्या वडापावच्या,भेळच्या गाडीवर,गावातील कुठल्या तरी शेवचिवडा हॉटेलमध्ये थांबून वाईन शॉप मधून विकत घेतलेली दारू पिणे भाग पडू नये म्हणूनच कदाचित परमिटरूमचे भरमसाठ परवाने गेल्या ४० वर्षात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आले असावेत अर्थात जशी वाईन शॉपमधून दारू विक्री खरेदी करण्यासाठी परवाना आवश्यक आहे तसाच तो परमिटरूम मध्ये बसून दारू खरेदी करत पिण्यासाठीही.मात्र या नियमाचे पालन किती परमिटरूम चालक करतात हा एक शोध निबंधाचा विषय आहे.मात्र काही भ्रष्ट आणि लाचखोर उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांसाठी हि मोठी नामी संधी असून परमिटरूम मधून  नियमितीपणे होणारी दारू विक्री परवान्याची कुठलीही विचारपूस न करता बहुतांश परमिट रूम मधून होत असल्याची चर्चा सातत्याने होताना दिसून येते.मात्र या त्रुटींचा फायदा घेत परमिटरूम चालकाकडे ५० हजार रुपये दे अन्यथा तुझे स्टॉक रजिस्टर चेक करावे लागेल अशी धमकी देत लाचेची मागणी करणारा उत्पादन शुल्क विभागाचा एक अधिकारी लाच लुचपत विभागाने केलेल्या कारवाईत रंगेहाथ सापडला असून यामुळे राज्यभरात परमिट रूम चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.   

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार अमरावती उत्पादन शुल्क विभागातील दुययम निरीक्षक संजय उत्तम केवट व प्रशांत सांगोले यांनी एका परमिटरूम चालकाकडे ५० हजार रुपये लाचेची मागणी करीत ४० हजार रुपये इतकी रक्कम रोख स्वरूपात स्वीकारताना लाच लुचपत विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे.     या कारवाईमुळे उत्पादन शुल्क विभागातील भ्रष्ट अधिकारी नियमांना बगल देत दारू विक्री करणाऱ्या परमिटरूम चालकांना कसे लुबाडू शकतात हेच जणू पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.अमरावती येथील या कारवाईमुळे आता राज्यभरातील परमिटरूम चालकांकडून नियमाचे पालन होते का नाही यांची मोहीमच उत्पादन शुल्क विभाग राबवेल आणी अशा परमिटरूम मधून देशी विदेशी दारू विक्री करताना दारू पिण्याचा परवाना असलेल्या व्यक्तीनाच दारू विक्री केली जाते का आणि प्रत्यक्ष विक्री रजिस्टर आणि स्टॉक याचा ताळमेळ तपासला जाईल आणि बेकादेशीर रित्या होणाऱ्या दारू विक्रीस आळा बसेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.           

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *