ताज्याघडामोडी

मोटारसायकलचा वापर करीत मध्यरात्री स्मशानभूमीतून होणाऱ्या वाळूचोरीवर पंढरपूर शहर पोलिसांची कारवाई 

पंढरपूर शहरालगतच्या भीमा नदीच्या पात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविण्यात पंढरपूर शहर पोलिसांना यश आले असतानाच चारचाकी वाहनांच्या माध्यमातून होणारी वाळू चोरी जवळपास बंद झाल्याचे दिसून येत आहे.
 मात्र यावर उपाय म्हणून वाळूचोरांनी वेगळीच शक्कल लढवीली असून स्मशानभूमी सारख्या निर्मनुष्य ठिकाणाहुन मोटारसायकलचा वापर करीत मध्यरात्री सिमेंटीच्या रिकाम्या गोण्यात वाळू भरायची आणि एखाद्या ठिकाणी गोळा करून विक्री करण्याचा पर्यायी मार्ग शोधण्यात आला होता.काल शुक्रवार दिनांक २२ रोजी पेट्रोलिंग करण्यासाठी निघालेल्या पथकाने थेट रात्री एक वाजनेचे सुमारास स्मशानभूमी गाठली असता त्या ठिकाणी मोटरसायकलचा वापर करीत दोन इसम वाळू चोरी करून वाहतूक करीत असल्याचे दिसून आले.पोलीस आल्याचे पाहताच आपली हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी व वाळूने भरलेली तीन ठीके जागेवरच टाकून दोन इसम पसार झाले आहेत.
 या प्रकरणी एक काऴ्या रंगाची स्प्लेंडर प्लस कंपनीची मोटारसायकल तिचा आरटीओ पासिंग नं MH-13 DK 3145 सह तीन तीन सिमेंटच्या पांढ-या ठिक्यामध्ये भरलेली वाऴु असा अंदाजे २६ हजार किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे व सदर अज्ञात इसमाविरुध्द भादविक 379,34 सह गौण खनिज कायदा कलम 4(1),4(क),(1)21प्रमाणे पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *