गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

खळबळजनक! क्रिकेटवरून झालेल्या वादातून थेट गोळीबार !

भिवंडी, 23 जानेवारी : भिवंडीत शिवसेनेच्या शाखाध्यक्षासह एका महिलेवर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच क्रिकेटवरून झालेल्या वादातूनही तरुणावर गोळीबार करण्यात आला आहे.

क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मैदानाकडे जाणारा रस्ता अरुंद असल्याने गाडी मागे घेण्यावरून झालेल्या वादातून एकावर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना भिवंडीतील पायगाव गावात शनिवारी सायंकाळी घडली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा हल्ला पूर्व वैमनस्यातून झाला आहे का, याबाबतही पोलीस तपास करत आहेत .

प्रफुल्ल तांगडी असं या गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून पायगाव येथे फोर्टी प्लस क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आलं होते . मात्र या क्रिकेट ग्राऊंडकडे जाणारा रस्ता अरुंद असल्याने जखमी व हल्लेखोर यांच्या गाड्या समोरासमोर आल्या असता गाड्या मागे घेण्यावरून दोन गटात शाब्दिक बाचाबाची झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *