ताज्याघडामोडी

बुलेटसारखी इलेक्ट्रिक बाइक आणणार रॉयल एनफिल्ड

येत्या काही महिन्यांत आपली इव्ही TVS, Hero Motocorp, Ather आणि BMW सारख्या दुचाकी उत्पादक कंपन्या लाँच करणार आहेत. दरम्यान, बुलेट निर्माता कंपनी रॉयल एनफिल्ड आपली इलेक्ट्रिक बाइक लाँच करण्याच्या तयारीत आहे.

याबाबत रॉयल एनफिल्डचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ लाल म्हणाले की, भारतीय बाजारपेठ, उत्पादन आणि जागतिक बाइक मार्केटनुसार इलेक्ट्रिक बाइक्सची श्रेणी आणि वैशिष्ट्ये यावर चर्चा केली जात आहे.

रॉयल एनफिल्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद दासारी यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये पुष्टी केली होती की, इलेक्ट्रिक मोटरसायकल सेगमेंटमध्ये आयशरच्या मालकीची कंपनी प्रवेश करण्याची योजना आखत आहे. त्यानंतर कंपनीने २०२०-२१ च्या वार्षिक अहवालात इलेक्ट्रिक बाइक निर्मितीचा उल्लेख केला होता.

२०२३ मध्ये कधीही रॉयल एनफिल्ड ही बाईक लाँच केली जाईल. कंपनीने यासाठी यूकेमध्ये रिसर्च सुरू आहे. लवकरच या बाइकची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा असून ती पुढील वर्षी लाँच केली जाऊ शकते.

विनोद दासारी यांनी केलेल्या घोषणेनुसार, रॉयल एनफिल्ड इलेक्ट्रिक बाइकचा प्रोटोटाइप कंपनीने आधीच तयार केला आहे आणि इव्हीचे उत्पादन लवकरच सुरू करेल. रॉयल एनफिल्डने उत्पादित केलेली इलेक्ट्रिक बाइक नवीन इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर आधारित असण्याची अपेक्षा आहे आणि ती अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह सुसज्ज असेल.

इंडिया कार न्यूजच्या अहवालानुसार, ८ किलोवॅट ते १० किलोवॅट पर्यंतचा बॅटरी पॅक बाईक वापरू शकते आणि ती इलेक्ट्रिक मोटरशी जोडली जाईल. इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमधील सध्याच्या ट्रेंडनुसार, बाइकची पॉवर आणि पीक टॉर्क सुमारे ४० बीपीएच आणि १०० एनएम असणे अपेक्षित आहे. याच्या डिझाईन आणि फीचर्सबद्दल अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नसली तरी बुलेट मॉडेलसारखे असू शकते, अशी अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *