Uncategorized

पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवरील कारवाईमुळे हद्दीतील अनेक गावात अघोषित ”ड्राय डे” 

            ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री करणाऱ्यांबरोबरच दारू पिऊन वाहन चालिवणाऱ्यावर देखील अनेक ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे.या कारवाई मुळे काल ३१ डिसेंबर रोजी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याअंर्गत असलेल्या अनेक गावात अघोषित ”ड्राय डे” असल्याचे चित्र पहावयास मिळाले.तर अनेक ठिकाणी दारू पिऊन वाहन चालिवण्याऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.मात्र या कारवाया होत असल्याची माहिती मिळताच दारू पिण्याची ठिकाणे म्हणून ओळखली जाणारे अनेक धाबे आणि हॉटेल मध्ये केवळ जेवण आस्वाद घेऊनच बाहेर पडावे लागले असल्याची चर्चा होत आहे.
             या बाबत मिळालेल्या अधिक माहिती नुसार काल ३१ डिसेंबर रोजी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात जर कुठे अवैध दारू विक्री होत असल्याची आढळली अथवा दारू पिऊन वाहन चालविताना इसम आढळून आले तर तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिल्या होत्या.त्या नुसार पो.ना.गजानन माळी,पो.हे.कॉ. बन्ने , पो.ना.चंदनशिवे यांनी पोहोरगाव येथे.पो.ना. विनायक क्षिरसागर,पो.हे.कॉ.चवरे,पो.हे.कॉ.शिंदे यांनी भटुंबरे येथे,पो.कॉ. हणमंत भराटे,पो.हे.कॉ.पाटील,पो.कॉ. तांबिले यांनी लक्ष्मी टाकळी येथे.पो.कॉ. हनुमंत भराटे,पो.हे.कॉ. शिंदे , पो.ना. भोसले यांनी शेगाव दुमाला येथे.पो.ना.प्रकाश कोष्टी, स.पो.फौ. जाधव,पो.क.माळी यांनी रोपळे येथे केलेल्या कारवाईत देशी व विदेशी बनवटीच्या दारूचा मोठा साठा जप्त करीत गुन्हे दाखल करण्यात आले असून त्याच बरोबर अनेक ठिकाणी दारू प्राशन करून वाहन चालविणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
             अवैध दारू विक्री रोखण्यासाठी तालुका पोलीस ठाण्याची पथके पेट्रोलींग करत असल्याची व कारवाई करत असल्याची चर्चा झाल्याने ३१ डिसेंबर साजरा करणाऐवजी अनेक तळीरामांनी घर गाठल्याची चर्चा होताना दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *