

पंढरपूर शहरातील स्टेशन रोड परिसरात असणाऱ्या विवेक दिलीप शहा यांच्या शहा प्रोव्हिजन स्टोअर्सचे शटर उचकटून चोरट्याने ३५ हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे.या बाबत विवेक शहा यांनी पंढरपुर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.
दि.18/02/2022 रोजी विवेक दिलीप शहा यांनी रात्रौ 9/00 वा.मी दुकान बंद करुन शटरला कुलुप लावले व जेवण करून झोपण्याकरिता दुसऱ्या मजल्यावरगेले .त्यानंतर दि.19/02/2022 रोजी सकाळी 07/30 वा.चे सुमारास नगरपालिकेची कचऱा गोळा करणारी गाडी आल्याने कचरा टाकण्यास खाली आले असता किराणा दुकानाचे शटरचे कुलुप तोडलेले दिसले. शटरचे कुलुप तोडुन दुकानात आत प्रवेश करून दुकानातील काउंटरचे ड्राँवर मध्ये ठेवलेली 35000/-रोख रक्कम कोणीतरी आज्ञात चोरट्याने लंपास केली असल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.