ताज्याघडामोडी

आ.परिचारक यांची राज्य सरकारवरील टिका म्हणजे वेड पांघरून पेडगावला जाण्याचा प्रकार

आ.परिचारक यांची राज्य सरकारवरील टिका म्हणजे वेड पांघरून पेडगावला जाण्याचा प्रकार

केंद्राच्या अन्यायावर मौन आणि राज्यात राजकारण

विधानपरिषदेचे भाजपा समर्थक आमदार प्रशांत परिचारक यांनी नुकतेच पंढरपूरात महाविकास आघाडीच्या विरोधात आपल्या दारासमोर उभारुन आंदोलन केले आहे राज्य सरकारवर टिका केली आहे.हा प्रकार म्हणजे वेड पांघरुन पेडगावला जाण्याचा प्रकार आहे अशी टिका शिवसेनेचे पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे.एकीकडे केंेद्र सरकार राज्य शासनाच्या वाट्याचे विविध करापोटी संकलीत झालेले हजारो कोटी रुपये अडकावून ठेवत आहे.कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्यांना देण्यात येणार्‍या अर्थिक पॅकेजमध्ये महाराष्ट्राबाबत भेदभाव करीत आहे.त्याच वेळी राज्यातील भाजपा समर्थक नेते मंडळी मुख्यमंत्री निधीस मदत करण्याचे आवाहन करण्याऐवजी पीएम.केअर्स फंडास मदत करा असे आवाहन करुन या संकटकाळात देखील राजकारण करीत आहेत.असे असताना आता महाराष्ट्र बचाव आंदोलनाच्या माध्यमातून भाजपाने हसू करुन घेतले असून आ.परिचारक यांनी त्यांच्या आंदोलानबाबत जनतेत काय प्रतिक्रिया आहेत याचा कानोसा घेतला तर ते पुन्हा अशा प्रकारच्या आंदोलनाच्या भानगडीत देखील पडणार नाहीत अशीच प्रतिक्रिया यावेळी संभाजी शिंदे यांनी व्यक्त केली.
केंद्र सरकारने कोरोनाचा देशभरात फैलाव रोखण्याासठी वेळीच उपायोजना केली असती तर आज देशात गोरगरीब लोकांचे हाल झाले नसते हे सुर्यप्रकाशाइतके सत्य आहे.लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून हजारो किलोमीटरची पायपीट करीत लाखो कामगार घराकडे परतत होते तेव्हा त्यांना दिलासा देण्यास केंद्र सरकार अपयशी ठरले होते.मार्च महिन्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी 1 लाख 80 हाजर कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली पण त्यातील दमडीही सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचली नाही.राज्यातील शेतकरी तयार शेतीमाल घरात पडून असल्याने मोठया संकटात सापडला अशा संकटकाळात केंद्राने हमी भाव खरेदीचा विस्तार करणे गरजेचे असताना यात केंद्र शासन अपयशी ठरले.मुंबई हे जगातील 3 क्रमांकच्या अर्थिक केंद्र आणि 2 कोटीहून अधिक लोकसंख्येचे शहर आहे.या शहरातून लाखो कोटी रुपयांचे उत्पन्न केंद्र सरकारला प्राप्त होते पण मुंबईसाठी ठोस अर्थिक मदत देण्यास केंद्राने हात आखडता घेतला.राज्यातील शेतकर्‍यांसह दुग्धव्यवसायीक,इतर छोटे मोठे स्वयंरोजगार करणारे व्यवसायीक आदींना थेट अर्थिक मदत करण्याची गरज असताना महाराष्ट्रावर अन्याय करण्यात आला या बाबत आ.परिचारक यांनी चकार शब्द काढण्यास तयार नाहीत.आ.परिचारक यांनी राज्य शासनाच्या कर्जमाफीचा लाभ शेतकर्‍यांना मिळाला नाही अशी टिका करीत आहेत.त्यांनी एकदा भाजपा सरकारच्या काळात करण्यात आलेल्या फडव्या कर्जमाफीचा आढावा घ्यावा आणि शेतकर्‍यांच्या प्रतिक्रीयाही जाणून घेतल्या तर त्यांचा भ्रम दूर होईल.कोरोना मुळे संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना नव्याने कर्ज देण्यासाठी स्वत राज्य शासनाने हमी देण्याचा निर्णय घेतला आहे व तशा सुचना बॅँकाना देण्यात आल्या आहेत.तर शेतकर्‍यांना बांधावरच बियाणे व इतर आवश्यक बाबींचा पुरवठा व्हावा यासाठी ठोस उपायोजना केल्या आहेत.राज्यासह पंढरपूरातही हजारो परप्रांतिय कामगार अडकून पडल्यामुळे वास्तव्यास होते त्यांच्या प्रवासखर्चासह सर्व व्यवस्था राज्य शासनाने केली तर पंढरपूरातील जवळपास एक हजार मजुरांरान तामीळनाडूकडे रेल्वेद्वारे पाठविण्यात स्वत: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लक्ष घातले होते.
राज्यातील सामान्य जनतेला वैद्यकिय उपचाराचा भुर्दंड सहन करावा लागू नये म्हणून महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा विस्तार करुन राज्यातील सर्वच केशरी कार्ड धारकांचा आता यात समावेश करण्यात आला आहे.त्याच बरोबर सर्वसामान्य छोट्या व्यवसायीकांसाठी राज्य शासन ठोस उपायोजना करीत असून संकटकाळात केवळ राजकारण म्हणुन विरोध आंदोलन करुन महाराष्ट्र बचावाच्या नावाखाली भाजपा समर्थख चमकोगीरी करीत आहेत.महाराष्ट्राची लोकसंख्या आणि मुंबई महानगराची आंतराष्ट्रीय कनेक्टिीव्हीटी याचा विचार केला तर कोरोनाचा प्रसार राज्यात कशा प्रकारे झाला याचे संदर्भ विरोधकांच्या लक्षात येतील.सर्वांना सोबत घेवून चालणारे हे महाविकास आघाडीचे सरकार असून कोरोनामुळे महाराष्ट्रच काय तर सार्‍या जगावर संकट घोंगावत असताना भाजपा आणि त्यांच्या समर्थकांनी केलेले आंदोलन म्हणजे किळसवाण्या राजकारणाचा प्रकार आहे अशी जहरी टिका शिवसेनेचे पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी केली आहे.

या प्रसिध्दीपत्रकावर मा.जिल्हा प्रमुख साईनाथ अभंगराव.उपजिल्हा प्रमुख
सुधीरअभंगराव,तालुका प्रमुख महावीर देशमुख,शहर प्रमुख रविंद्र मुळे,उपतालुका प्रमुख बंडू डुबल यांच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *