ताज्याघडामोडी

चप्पल-दगड घेऊन मागे धावली जनता; भाषण अर्धवट सोडून मंत्र्यांचा काढता पाय

चप्पल, शूज घेऊन पळणारी ही गर्दी कोणा सर्वसामान्य माणसाला मारण्यासाठी जात नाही, तर ते एका नेत्याचा पाठलाग करीत आहेत. हे नेता कोणी सामान्य नाही तर राज्याचे कामगार मंत्री आहेत.

ही घटना तेलंगणातील आहे. कामगार मंत्री एम.मल्ला रेड्डी एका मीटिंगमध्ये सामील होण्यासाठी रविवारी सायंकाळी तेलंगणातील घाटकेसर येथे आले होते. मंत्री येथे गैर राजकीय समुदायाचा प्लॅटफॉर्म रेड्डी जागृतीकडून आयोजित बैठकीत सामील होण्यासाठी आले होते. यादरम्यान मंत्री एम. मल्ला रेड्डी यांच्यावर कथितरित्या येथील उपस्थित काही लोकांनी चप्पल-शूज, दगड आणि खुर्चींनी हल्ला केला.

या सर्व प्रकारानंतर पोलिसांनी मंत्र्यांना स्टेज सोडून बाहेरच्या दिशेने घेऊन गेले. या कार्यक्रमात मल्ला रेड्डी राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचं कौतुक करीत होते. ज्याचा काही लोकांनी विरोध केला.

यानंतर तेथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी मल्ला रेड्डी यांच्या विरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली. मंत्र्यांचं भाषण संपल्यानंतर काही लोकांनी मंत्र्यांच्या जमावावर खुर्ची फेकण्यास सुरुवात केली. यानंतर पोलिसांनी मंत्र्यांच्या सोबत असलेल्यांना सुरक्षित स्थळी हलवले. घाटकेसरचे पोलीस इन्स्पेक्टर एन. चंद्र बाबू यांनी मीडियासमोर या घटनेची पुष्टी केली. त्यांनी सांगितलं की, या प्रकरणाबाबत अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही. दुसरीकडे मल्ला रेड्डींनी घोषणा केली की, ते समुदायाच्या मागणीनुसार, मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याकडून रेड्डी कॉर्पोरेशनचं गठण करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *