ताज्याघडामोडी

एकाच दिवशी शेगाव दुमाला,अजनसोंड,चिंचोली भोसे येथील अवैध वाळू उपशावर कारवाई

शेगाव दुमाला,अजनसोंड,चिंचोली भोसे येथील अवैध वाळू उपशावर कारवाई 

पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या कारवाईने वाळू चोरांचे धाबे दणाणले 

एकीकडे राज्यात जिल्ह्यात दरदिवशी कोरोनाचा कहर वाढत चालला आहे.त्याच वेळी पोलिसांना सामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी जीवधोक्यात घालून काम करावे लागत आहे.अशावेळी पोलीस कर्मचारी बंदोबस्तात व्यस्त असल्याचा फायदा उठवत पंढरपुर तालुक्यातील वाळू चोरटे पुन्हा जोमाने सक्रिय झाले आहेत.वाळू चोरी रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांना मारहाण पर्यंत या वाळू माफियांची मजल गेली असल्याचे पाच दिवसापूर्वी तपकिरी शेटफळ येथील घटनेवरून दिसून आले आहे.पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात असतानाच  काल एकाच दिवशी तीन ठिकाणी अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यात आली आहे. 
        अजनसोंड ता.पंढरपूर येथे करण्यात आलेल्या कारवाईत मौजे अंजनसोड ते चोरमळा सुस्ते जाणारे रोडने ट्रँक्टर व डपिंग टेलरचे साह्याने चोरून वाळू वाहातुक होत आहे अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने फिर्यादी पो.ना. बापुसाहेब मोरे,स.पो.फौ. फुगारे,पो.ना. भोसले हे अजनसोंड शिवारात असलेले सत्यावान तानाजी घाडगे रा अजनसोंड यांचे वस्तीजवळ आलो असता तेथे समोरून एक ट्रँक्टर अजनसोंडकडे येत असलेला दिसला.त्यास थांबविले व ट्रँक्टरचे चालकास त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव युवराज तात्यासाहेब घाडगे वय 28वर्ष रा अजनसोंड ता पंढरपुर असे असल्याचे सांगितले.ताब्यातील ट्रँक्टरचे ट्रली तपासुन पाहीले असता. वाळु मिळुन आले आहे. त्याचे वर्णनखालीलप्रमाणे 1)7,04,000/- एक लाल रंगाचे महिद्रा अर्जुन कंपणीचा त्याचा मडेल नं 605 D IIअसा असलेला त्याचा RTO NO-MH-45-F4789 व चेसी नं RJU1748 व इंजि नं RJU 1748असा जुना वापरता ट्रँक्टर व त्यास लाल पिवळ्या रंगाची डपिंग ट्रली जोडलेली व डपिंग ट्रलीमध्ये एक ब्रास वाळु असा एकूण 7,04,000 मुद्देमाल वर्णनाचे ट्रँक्टर व ट्रली वाळुसह ताब्यात घेण्यात आला आहे.या प्रकरणी भा.द.वि.क 379,सह पर्यावरण संरक्षण कायदा कलम 9 व 15 प्रमाणे फिर्याद नोंदविण्यात आली आहे.
शेगाव दुमाला येथे करण्यात आलेल्या कारवाईत एक लाल रंगाचा स्वराज्य कंपनीचा बिगर नंबरचा ट्रॅक्टर मॉडेल चेसी नं QWTA 51606000493 लाल रंगाच्या डम्पिंग ट्रॉलीसह भीमा नदीच्या पात्रातून ताब्यात घेण्यात आला असून एक ब्रास वाळुसह २ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.या प्रकरणी 1)अक्षय अजिनाथ आटकळे वय 23वर्ष 2) विकास अंकुश आटकळे वय 23वर्ष दोघे रा शेगाव दुमाला ता पंढरपुर यांच्याविरोधात पो.काँ. अनिल निलकंठ वाघमारे यांनी भा.द.वि.क 379,34सह पर्यावरण संरक्षण कायदा कलम 9 व 15 प्रमाणे सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे. या कारवाईत स.पो.फौ.किणगी यांचाही सहभाग होता.
तर याच दिवशी चिंचोली भोसे ता. पंढरपूर येथे करण्यात आलेल्या कारवाईत पो.कॉ. नितीन महादेव माळी यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार मौजे चिंचोली भोसे येथील पाणवट्टा जवळील भिमानदीपात्रात ट्रँक्टर व डंपिगचे सहाय्याने अवैध्य वाळु उपसा चालु आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी गेले असता एक ट्रँक्टर व डंपिग टेलरमध्ये भिमा नदीपात्रातील वाळु भरून पानवट्टाकडे येत असताना दिसला सदर ट्रँक्टर व डंपिग टेलर चालक पोलीस येत असल्याचे पाहुन ट्रँक्टरचे पाठीमागील डंपिग टेलर मधील वाळु भिमा नदीपात्रातील रस्त्यावर उराळून, ट्रँक्टर व डंपिग टेलर मौजे चिंचोली भोसे ता.पंढरपूर येथे पाणी पुरवठा टाकी जवळ सोडुन पळून गेला. सदर ट्रँक्टर, डंपिग टेलर व त्यामधील खाली केलेल्या वाळुचे वर्णन खालीलप्रमाणे-1)2,04,000/-रु त्यात एक लाल रंगाचा स्वराज 855 कंपनीचा बिगर नंबरचा ट्रँक्टर त्याचा चेसी नं. A51606000133 तसेच सदर ट्रँक्टरला जोडलेली एक बिगर नंबरची लाल पिवळे रंगाची डंपिग ट्राँली ताब्यात घेण्यात आली आहे. दर ट्रँक्टरचा चालक व मालक यांचे विरुध्द भा.दं.वि. 379 ,34सह पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 9,15प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यानी एकाच दिवशी तीन ठिकाणी कारवाई करून वाळू चोरांना धडा शिकविण्याचा प्रयत्न केला असला तरी शेगाव दुमाला व चिंचोली भोसे हे वाळू चोरीचे हॉटस्पॉट झाले असून येथून नियमितपणे व बिनधास्तपणे वाळू चोरी होते अधून मधून झालेल्या कारवाईनंतर पुन्हा दोनच दिवसात वाळूचोर सक्रिय होतात अशीही चर्चा होताना दिसून येत आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *