ताज्याघडामोडी

एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा निधीबाबत बोलावे ः सिध्देश्‍वर आवताडे

एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा निधीबाबत बोलावे ः सिध्देश्‍वर आवताडे
मंगळवेढा(प्रतिनिधी)ः निवडणूकीच्या अंतिम टप्प्यात सत्ताधारी व विरोधक असलेले राजकिय पक्षाचे नेते एकमेकांवर टिका टिप्पणी करून चिखलफे करीत आहेत. परंतू त्यांनी आता हे बंद करून निधीबाबत आपली भूमिका जाहिर करावी असे आवाहन पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार सिध्देश्‍वर आवताडे यंानी मरवडे येथील प्रचार सभेत बोलताना केले.
सिध्देश्‍वर आवताडे म्हणाले,देशात व राज्यात सत्तेवर असतानाही यांनी मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावचा पाणीप्रश्‍न सोडविला नाही.निधीबाबत धोरणही ठरवले नाही.सैनिकांबाबत अपशब्द वापरणारे आता दुसर्‍याच्या पंक्तीने पळीने तुप वाढत आहेत.माइया कार्यकर्त्यांना दमबाजी केली जात आहे.परंतू ज्या गावच्या बोरी आहेत, त्याच गावच्या बाभळी आहेत हे दमबाजी करणार्‍यांनी लक्षात ठेवावे.शेतकरी,शेतमजूर व युवकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर आहे.शासन दरबारी पाठपुरावा करून शेतकर्‍यांसाठी हमीभाव केंद्र चालू केले.शेतकर्‍यांसाठी रात्रीचा दिवस करण्याची माझी तयारी आहे.एक वेळ संधी दया,तुम्हाला कोणाच्या पायाला हात लावण्याची गरजही पडणार नाही असे आवताडे यांनी सांगितले.
यावेळी बोलताना माजी उपसभापती बाळासाहेब शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील चारही कारखान्यात स्थानिक लोकांना काम नाही,सर्व जातीधर्माच्या लेाकंाना सोबत घेवून जाणारा युवक व विकासाची व्हिजन असलेला युवक म्हणून सिध्देश्‍वर आवताडे यांना संधी दयावे असे आवाहन केले.
वसंतराव मुदगूल यांचा पाठींबा
 सिध्देश्‍वर आवताडे यांच्या प्रचारार्थ मरवडे येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत मंगळवेढयाचे माजी उपनगराध्यक्ष वसंतराव मुदगूल यांनी सिध्देश्‍वर आवताडे यांना जाहिर पाठींबा दिला.यावेळी मुदगूल यांचा सिद्धेश्‍वर आवताडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *