ताज्याघडामोडी

पंढरपूर शहर तालुक्यातील पूरग्रस्तांना दिवाळीपूर्वी तातडीने आर्थिक मदत मिळावी नगरसेवक डी. राज सर्वगोडयांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी 

पंढरपूर शहर तालुक्यातील पूरग्रस्तांना दिवाळीपूर्वी तातडीने आर्थिक मदत मिळावी

नगरसेवक डी. राज सर्वगोड यांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी 

 

पंढरपूर- नुकत्याच आलेल्या महापुराचाफटका बसल्याने प्रचंड आर्थिक नुकसान सोसलेल्यापंढरपूर शहर व तालुक्यातील पूरग्रस्तांना शासनाने तातडीने आर्थिक भरपाई द्यावी अशी मागणी नगरसेवक डी.राज सर्वगोड यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

   गतवर्षी 7 ऑगस्ट 2019 रोजीच्या काळात पंढरपूर शहर व तालुक्यासयावर्षीप्रमाणेच पुराचा प्रचंड फटका सहन करावा लागला होता.त्यावेळी राज्यात सत्तेत असलेल्या महायुती सरकारने शहरातील पूरग्रस्तांना 15 हजार तरग्रामीण भागातील पूरग्रस्तांना 10 हजार रुपये प्रमाणे तात्काळ आर्थिक मदत दिली होती.याची आठवण या निवेदनाद्वारे नगरसेवक डी.राज सर्वगोडयांनी महाविकासआघाडी सरकारला करून दिली आहे.कोरोनामुळे राज्यातील सर्वसामान्य कष्टकरी जनता प्रचंड आर्थिक अडचणीत आलेली असतानाच अतिवृष्टी आणि महापुरामुळे पूरग्रस्तनागिरकांचे कंबरडे मोडले आहे.दिवाळीचा सणचार दिवसावर आलेला असतानाही शासनकडून अजूनही पुरबाधितांना मदत मिळत नाही.तरी मुख्यमंत्र्यांनीयागंभीर बाबीचीदखल घेत पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागातील पूरग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात आल्याची माहिती नगरसेवक डी. राज सर्वगोड यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *