ताज्याघडामोडी

मराठा समाजाच्या न्याय व हक्कासाठीच लढा : खा. संभाजीराजे करकंब येथे साधला समाजबांधवांशी संवाद

मराठा समाजाच्या न्याय व हक्कासाठीच लढा
: खा. संभाजीराजे

करकंब येथे साधला समाजबांधवांशी संवाद

करकंब:-सर्वोच्च न्यायालयाकडे असलेला आरक्षणाचा खटला फेटाळला आहे यामध्ये कोणाची चुक व कोणाचे बरोबर हे न पाहता शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करावी मराठा समाजाला न्याय व हक्क मिळाला पाहिजे यासाठी राजकारण विरहित लढा उभारला असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले
करकंब येथे मराठा आरक्षणाच्या संदर्भात कार्यकर्त्यांशी खा छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी विचारविनिमय करताना ते बोलत होते. यावेळी पांडुरंग कारखान्याचे माजी उपाध्यक्ष नरसाप्पा देशमुख,संभाजी ब्रिगेड पुणे विभागाचे अध्यक्ष किरणराज घाडगे, जिल्हा उपाध्यक्ष अमोल शेळके, प्रा सतीश देशमुख, पोपट धायगुडे, अमर चव्हाण, तात्याबा मोहिते, अजित देशमुख, शिवाजी व्यवहारे, राजू गुळमे आदी उपस्थित होते.
मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी समाजाच्या बरोबर काम करण्याची भूमिका असल्याने कोणाच्याही टीकेकडे न पाहता समाजाचे नुकसान होऊ नये म्हणून आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाला दिशा देण्याचे काम करणार असल्याचे खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी सांगितले.
यावेळी करकंब येथील शिवकालीन वेशीला तडे गेले असल्याने त्याची डागडुजी करण्यासाठी पुरातन विभागाची परवानगी मिळवून द्यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड च्या वतीने खा छत्रपती संभाजी राजे यांच्याकडे केली.
चौकट
पाच सहा मागण्या

सारथी संस्थेला निशी, अण्णासाहेब पाटील महामंडळास मदत, प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह, ओबीसी प्रमाणे सवलती, २१८५ पात्रता धारकांना नोकरी, उच्च शिक्षणात जागा उपलब्ध करून द्याव्यात आदी मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या असल्याचे खा छत्रपती संभाजी राजे यांनी सांगितले

फोटो ओळ
करकंब येथील बालाजी हॉटेल येथे खा छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *