लाकडाची वाहतूक करणाऱ्या इसमाकडून प्रति ट्रॅक्टर २ हजार रुपये प्रमाणे ८ हजार लाचेची मागणी करून वनपाल प्रियंका देवकर यांच्यासाठी सदर लाचेची रक्कम स्वीकारताना वसमत वन परिक्षेत्र कार्यालयाचा वनरक्षक संदीप तात्याराव पंडित हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत रंगेहाथ सापडला आहे.
सदर प्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईमुळे या परिसरात खळबळ उडाली आहे.नांदेड परिक्षेत्र पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली युनिटने हि कारवाई करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा तपास लाप्रवी चे पोलीस उपअधीक्षक निलेश सुरडकर हे करीत आहेत. 