

काल भल्या पहाटे तालुका पोलिसांनी कारवाई करून देखील पुन्हा या ठिकाणाहून अवैध वाळू उपसा सुरु असल्याची माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलिसांनी आज पुन्हा कारवाई करत एक महिंद्रा मँक्स पिकअप (MH 13 R 5765) आर्धाब्रास वाळू सह ताब्यात घेतला असून या प्रकरणी नारायण मराठे रा.मुंढेवाडी याच्या विरोधात भादवि 379 सह गौण खनिज कायदा कलम 4(1),4(क),(1) व 21, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान का.कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत पो.काँ.देवेंद्र हिंदुराव सुर्यवंशी यांनी फिर्याद दाखल केली असून मुंढेवाडी गावचे शिवारातील पिराचे मंदिराजवळ भीमानदीचे पात्रातून चोरून एक पिकअपमध्ये वाळू भरत असल्याची माहिती मिळताच पो.हे.कॉ.ताटे, पो.हे.काँ.शिंदे,पो.काँ.सूर्यवंशी यांनी हि कारवाई केली आहे.