

जिल्हाधिकारी सोलापूर तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज पंढरपूर नगर पालिकेचा प्रारूप प्रभाग रचना आराखडा जाहीर केला असून या प्रभाग रचने बाबत १७ मार्च २०२० पर्यंत हरकती दाखल करता येणार आहेत.
पंढरपूर नगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक २ च्या सीमारेषा खालील नकाशात लाल रंगात दर्शविल्या असून या प्रभागाची २०११ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या ५०४६ इतकी असून यामध्ये अनुसूचित जाती ११७ तर अनुसूचित जमातीचे १८५ रहिवाशी समाविष्ट आहेत. ते कर्नल भोसले चौक,डाळे गल्ली परिसर ते लोकमान्य विद्यालय ते जुनी पेठ पोलीस चौकी ते जोजारे बोळ ते डाळे गल्लीचा काही परिसर अशी या प्रभागाची प्रस्तावित रचना आहे.