Uncategorized

असा आहे प्रास्तवित प्रभाग क्रमांक ५

जिल्हाधिकारी सोलापूर तथा जिल्हा  निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज पंढरपूर नगर पालिकेचा प्रारूप प्रभाग रचना आराखडा जाहीर केला असून या प्रभाग रचने बाबत १७ मार्च २०२० पर्यंत हरकती दाखल करता येणार आहेत.
     पंढरपूर नगर पालिकेच्या प्रस्तावित प्रभाग रचनेत प्रभाग क्रमांक ५ हा विस्ताराने खूप मोठा असल्याचे दिसून येत असून क्रांती चौक ते भजनदास चौक ते नाथ चौक ते मुक्ताबाई मठ परिसर ते महाद्वार ते नदीच्या पैलतीरावरील म्हसोबा मंदिर ते इस्कॉन टेम्पल ते नगर पालिका दवाखाना असा परिसर यात समाविष्ट करण्यात आला आहे.
या प्रभागाची २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ५११६ इतकी निर्देशित करण्यात आली असून यात अनुसूचित जाती १७६ तर अनुसूचित जमाती २९९ इतकी संख्या निर्देशित करण्यात आली आहे.    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *