

पंढरपूर शहरातील पुंडलिक परिसरात सुरेश गंगाधर दर्शने हे कुटुंबासह वास्तव्यास असून दिनांक 16/10/2021रोजी ते सहकुटुंब सातारा येथे आपली मुलगी सुप्रिया प्रसाद पेठकर हिचेकडे गेले असताना दि-16/10/2021रोजी सकाऴी 10/00वा ते दि 24/10/2021रोजी सायंकाऴी 06/30 वा चे दरम्यान दर्शने यांच्या घराचा कांडीकोयंडा उचकटून अज्ञात चोरट्यानी अर्बन बँकेच्या दोन एफ डी ची कागदपञे व पासबुक यासह दोन चांदीचे गणपतीची मुर्ती ,एक चांदीचा लहान पेला,एक चांदीची लहान वाटी असे साहित्य लंपास केले आहे.
या बाबत आमेय शशीकांत न्यायाधीश यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अज्ञात चोरट्याने फिर्यादी न्यायाधीश यांचे मावस काका सुरेश दर्शने यांचे संमतीशिवाय मुद्दाम लबाडीने चोरुन नेऊन व घराचे कडीकोयंडा उचकटुन आत प्रवेश करुन घरफोडी चोरीचा प्रयत्न केला, मावस काका परगावी असलेने आणखीन काही चोरीस गेले हे मला माहित नाही अशा आशयाची फिर्याद पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.