

पंढरपूर तालुक्यातील मुंडेवाडी येथील भीमा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन केलेल्या कारवाईत टाटा कंपनीचा पांढ-या रंगाचा योध्दा माँडेलचा टँम्पो नं.MH 13 CU 3276 हा नदीपात्रातून अवैध रित्या वाळू उपसा करून वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आल्याने सदर पिकअप वाळूसह ताब्यात घेतला असून या प्रकरणी सागर जोतिबा कोळी वय.22 वर्ष रा गोपाळपुर ता. पंढरपूर याच्या विरोधात पो.काँ. देवेंद्र हिंदुराव सुर्यवंशी यांनी
दाखल केलेल्या फिर्यादीनुसार भादवि 379 सह गौण खनिज कायदा कलम 4(1),4(क),(1) व 21, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान का.कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज दि.27/10/2021 रोजी पहाटे 02/30 वा.सुमारास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.क. ताटे,पो.हे.काँ शिंदे यांनी सदर कारवाईत सहभाग घेतला.