ताज्याघडामोडी

सहा महिन्यापासून रखडलेले काम आमदार प्रशांत परिचारक यांच्यामुळे लागले मार्गी -पंडीत शेंबडे

सहा महिन्यापासून रखडलेले काम आमदार प्रशांत परिचारक यांच्यामुळे लागले मार्गी पंडीत शेंबडे

        पंढरपूर ३ -गेल्या सहा महिन्यापासून रखडलेल्या अहिल्या देवी चौकातील कामाबाबत आमदार प्रशांत परिचारक यांनी घटनास्थळावरून ठेकेदारासह अधिकाऱ्यांना खडसावल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा वेगाने कामाला लागली व एकादिवसात सदर सस्ते दुरूस्तीचे काम सुरू झाले. यामुळे स्थानिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

        पंढरपूर तालुक्‍यातील भटुंबरे हद्दीत अहिल्यादेवी चौकाचे काम गेल्या सहा महिन्यापासून रखडले
होते. सदर चौकापासून तालुक्‍यातील करकंब पर्यंत सिमेंटच्या रस्त्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे

         मात्र अहिल्यादेवी चौकातील परिसर संबंधित ठेकेदाराने दोन्ही बाजुने रस्ता खणून ठेवला होता. गेल्या सहा महिन्यापासून अशीच परिस्थिती कायम होती. यावर स्थानिकांनी व शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी केल्या मात्र अधिकारी व ठेकेदार यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळत नव्हता. श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास जाणारी ऊस वाहतूक, दैनंदिन येणारी शेकडो वाहने यामुळे हा रस्ता अक्षरश: धोकादायक बनला होता. स्थानिकांना तर दुचाकी घेवून जातानाही कसरत करावी लागत होती.या  रस्त्यावरून बरेच लोकप्रतिनिधी जात होते, पण कोणीही याकामाकडे लक्ष दिले नाही. परंतु आमदार प्रशांत परिचारक यांनी आमच्या मागणीचा विचार करून पंढरपूर-टेंभुर्णी रोडवरील अहिल्यादेवी होळकर चौक येथील श्री.विठ्ठल सहकारी कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम एक फोनदारे मार्गी लावले. अशी माहिती तेथील स्थानिक नागरीक पंडीत शेंबडे यांनी दिली.

        दरम्यान आमदार प्रशांत परिचारक हे बुधवार दि.२ डिसेंबर २०२० रोजी गुरसाळे येथे एका कार्यक्रमानिमित्त गेले असता तेथील शेतकऱ्यांनी त्यांना रस्त्याची पाहणी करण्याची विनंती केली. आमदार प्रशांत परिचारक यांनी देखील तातडीने घटनास्थळी भेट देत रस्त्याचे काम पाहून नाराजी व्यक्त केली.त्यांनी तातडीने राष्ट्रीय रस्ते वाहतुकीचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांना दूरध्वनी केला. तसेच रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारास देखील फोन करून चांगलेच खडसावले. हे काम तातडीने सुरू करावे अशी सूचना दोघांनाही दिली.

        सरकारी काम सहा महिने थांब अशी म्हण आहे. मात्र आमदारांचा फेन जाताच सहा
महिन्यापासून थांबलेले हे काम अवघ्या चोबीस तासात सुरू झाले. यामुळे या परिसरातील मोठा प्रश्न मार्गी लागला असून येथील पंडीत शेंबडे यांच्यासह शेतकऱ्यांनी आमदार प्रशांत परिचारक यांचे आभार व्यक्त केले.

        यावेळी माजी सभापती राजेंद्र पाटील, पंडीत शेंबडे, नारायण मेटकरी, अजय खांडेकर, भिमराव
शिंदे, राजू शेंबडे, भाऊ ढवळे, गणेश ढवळे, बाबासाहेब येडगे, नवनाथ मेटकरी, रमेश शेंबडे, नारायण शिंदे, श्रीमंत परचंडे आदी स्थानिक नागरीक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *