

पंढरपूर शहर हद्दीतील भिमा नदी पात्रातुन मरळ मातीचा चोरुन उपसा करुन वाहतूक करणाऱ्या टिपरवर शहर पोलिसांनी कारवाई केली असून या घटनेत पांढऱ्या रंगाचा टिपर रजि. क्र. डब्ल्यु. बी. 33 सी 8287 च्या सहाय्याने अवैद्यरित्या वाहतुक करत असल्याचे आढळून आल्याने मातीसह ताब्यात घेण्यात आला आहे.
सदर प्रकरणी इसम नामे 1) जयराम चिमाजी जाधव, वय 32 वर्षे, रा. पद्मावती गल्ली, पंढरपूर (टिपर चालक) 2) मदन बाबुराव गोंडफळे, वय 55 वर्षे, रा. अनिलनगर, पंढरपूर , पंढरपूर, जि. सोलापूर हे कुंभार नामे 3) सिद्धु कुभार, रा. कुंभार गल्ली, पंढरपूर यांचे सागंणेवरुन 4) सोमनाथ शिवाजी पाटील, रा. कवठळी, ता. पंढरपूर यांच्या विरोधात 379, 109, 34 भादवि सहकलम 21(4) गौण खनिज अधि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी समाधान केरु माने, वय 29 वर्षे, धंदा नोकरी (पोलीस शिपाई 2190) यांनी फिर्याद दाखल केली असून पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार स.पो.नि. मगदुम, पो.हवा. कदम,पो.ना.पठाण, बनसोडे व पो.शि. पाटील यांनी अर्बन बँक चौक, पंढरपूर येथे सापळा लावुन हि कारवाई केली आहे.