Uncategorized

अखेर जिल्हा परिषद बांधकाम विभागाची वादग्रस्त निविदा प्रक्रिया रद्द 

सोलापुर जिल्हा परिषद मधील पंढरपूर,माढा, माळशिरस मधील २५१५ चे छोटे कामांचे एकत्रीकरण करुन चार मोठ्या ५ कोटींचे कामांच्या निविदा काढल्या होत्या. या विरोधात महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना ने संबंधित विभागास कोर्टाचा निर्णय व शासन निर्णय तसेच संघटनेचा पत्र व इतर महत्त्वाचा कागदपत्रे चा पाठपुरावा केला होता तसेच या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनास दिला होता.याबाबत या सर्वांची गंभीर दखल सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाने घेऊन सदर सर्व कामांच्या निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. 

तसेच आता या  सर्व छोटे कामांची पंचायत समिती स्तरावर निविदा प्रक्रिया काढण्यात मंजुरी देण्यात आली आहे.या माध्यमातून हे  संघटनेचे हे फार मोठे यश आहे आता यांची अंमलबजावणी सर्व राज्यांतील सर्व जिल्हा परिषद, नगरपालिका,व इतर विभागास  बंधनकारक होईल आणि छोट्या कंत्राटदार यांना न्याय मिळेल  संघटनेच्याया ऐतिहासिक यशात इंजि.कांतीलाल डुबल,कैलास लांडे,नरेंद्र भोसले,मनोहर शिराळ, राजकुमार खुर्द, सुदर्शन साठे,आंनद वंजारे, यडगे, महामुनी, देशमुख,विजय कुंभार, विकास  सांळुखे, अशा अनेक अभियंता व कंत्राटदार आदींचा पाठपुरावा महत्वपूर्ण ठरला असून महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *