पंढरपूर तालुक्यातिल मौजे.तावशी येथिल जि.प.प्रा.शाळा I.S.O.नामांकित व जिल्हास्तरिय आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त व डिजिटल आहे.सदर शाळेतिल सध्याचा शिक्षक स्टाफ गुनावत्तापुर्न शिक्षण देत असुन सदर शाळेला पाच शिक्षकांची गेल्या वर्षापर्यन्त नियुक्ति होती.परंतु चालू वर्षी एक शिक्षकाची जागा रिक्त झाली असुन सध्या त्या शिक्षकाचा भार या चार शिक्षकावर पडत आहे. त्यामुळे सप्टेंबर २०१९ शिक्षक निश्चिती नुसार शिक्षकाची एक जागा रिक्त आहे. कोरोनामुळे एकतर वर्षभर शाळा बंद आहेत. ऑनलाईन शिक्षण चालू आहे. शासनाकडुन शिक्षकांना मतदार नाव- नोन्दनी व इतर शाळाबाह्य कामे नियमितपने दिली जातात व त्यंच्याकडून शाळेची गुनवत्ता,क्रीडाप्रकार, सांस्कृतिक कार्यक्रम,शालेय पोषण-आहार व सर्व प्रकारचा जमा-खर्च,आहवाल लिखित स्वरुपात ठेवन्याची आपनच अपेक्षा करतो?? त्यामूळे शिक्षकान्वरिल वाढत्या कामाचा भार कमी व्हावा व शाळेची गुनवत्ता वाढावी..म्हनुन जि.प.प्रा.शाळा तावशी येथील रिक्त जागेवरिल शिक्षकाची नेमनुक त्वरित करावी..अन्यथा संभाजी ब्रिगेड आंदोलन करनार…!! अशा आशयाचे निवेदन शाळा व्यवस्थापण समिति अध्यक्ष व संभाजी ब्रिगेड सोलापुर जिल्हा संघटक प्रमोद जगदाळे यानी- मुख्य.कार्यकारी अधिकारी व प्रा.शिक्षनाधिकारी जि.प.सोलापुर,गटविकास अधिकारी व गटशिक्षनाधिकारी पं.स.पंढरपूर याना देन्यात आले.
