Uncategorized

१८ ते ४४ वयोगटासाठी मंगळवार पासून कासेगाव आरोग्य केंद्रात मिळणार कोवॅक्सीनचा दुसरा डोस 

१ मे महाराष्ट्र दिनापासून राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम हाती घेण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला होता.याचाच एक भाग म्हणून पंढरपूर तालुक्यातील कासेगाव प्राथमिक आरोग्य केंदाच्या माध्यमातून गत मे महिन्यात १८ ते ४४ या वयोगटासाठी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली व जवळपास ८०० नागिरकांना याचा लाभ मिळाला होता.सदर लसीकरणात नागिरकांना कोवॅक्सीन या भारत बायटेक निर्मित लसीचा पहिला डोस मिळाला होता.केंद्र सरकारने सिरम इन्स्टिट्यूट निर्मित कोविशील्ड लसीच्या दुसऱ्या डोसचा कालावधी ४ ते ६ आठ्वड्यावरून वाढवीत ८ ते १२ आठवडे केला असला तरी कॅव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस मात्र ३० दिवसाचा कालावधी पूर्ण झाल्यावरच मिळणार आहे.

    आणि त्याचाच एक भाग म्हणून मंगळवार दिनांक ८ जून पासून कासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पहिला डोस घेतलेल्या नागिरकांसाठी ११ जून पर्यंत दुसरा डोस घेण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.     जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी आज काढलेल्या परिपत्रकानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र कासेगाव तालुका पंढरपुर येथे १८८ ते ४४ वयोगटाच्या दुसऱ्या डोससाठी १)  दिनांक ८ जून रोजी १८७  २) दिनांक ९ जून रोजी १९४ ३) दिनांक १० जून रोजी १८७ ४) दिनांक ११ जून रोजी १९१ असे एकूण ७५९ डोस उपलब्ध होणार आहेत.                 

 तरी १८ ते ४४ वयोगटातील ज्यांनी ज्या तारखेला पहिला डोस घेतला आहे त्यांनी त्याच तारखेला दुसरा डोस घेण्यासाठी सदर लसीकरण केंदावर जावे व जाताना सोबत पहिला डोस घेताना नागिरकांनी प्रस्तुत केलेले ओळखपत्र अथवा पहिला डोस घेताना नोंदवलेला मोबाईल क्रमांक आणि मोबाईल सह उपस्थित रहावे,इतरांनी या ठिकाणी विनाकारण गर्दी करू नये असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *