भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपसमितीबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहल्यानंतर नामदार विजय वडेट्टीवार यांनी पडळकर हे नवीन गवत आहे अशी टीका केली होती.या टीकेला जोरदार प्रतिउत्तर देताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी मंत्री वडेट्टीवार यांच्यावर कमिशन खोरीसहित अनेक आरोप केले होते त्यामुळे नामदार वडेट्टीवार हे चांगलेच संतापले असून पडळकरांनी माझ्यावर केलेले आरोप सिद्ध करावे, पुरावे द्यावे. त्यांनी केलेले आरोप सिद्ध झाले तर मी राजकारण सोडेल.
माझ्या नावाने, माझ्या नातेवाईकांच्या नावे कुठलंही दारुचे दुकानं नाही, छत्तीसगडमध्ये कंपनी नाही. माझ्या आईने कष्ट करुन मला शिकवलं. ओबीसी चळवळीला बदनाम करण्याचं काम पडळकर करतात. सुपारी घेऊन चळवळ संपवण्याचं काम ते करत आहेत असा आरोप त्यांनी केला असून माझी छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. कोणत्या ठिकाणी ही फॅक्ट्री आहे हे त्यांनी सांगावं. पत्ता काढावा. खऱ्या बापाची औलाद असेल तर आरोप सिद्ध करावे. नाही तर मी अब्रुनुकसानीचा दावा करेन, असा इशारा वडेट्टीवारांनी दिला आहे.
तर राजकारण सोडेल
पडळकर यांनी माझ्यावर केलेले आरोप सिद्ध करावे, पुरावे द्यावे, आरोप सिद्ध झाले तर मी राजकारण सोडेल. माझ्या नावाने, माझ्या नातेवाईकांच्या नावे कुठलंही दारुचे दुकानं नाही. छत्तीसगडमध्ये कंपनी नाही. पडळकर खऱ्या बापाची औलाद असेल तर, तर त्यांनी आरोप सिद्ध करावे, असं आव्हानच त्यांनी दिलं.
