गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भाजप आमदाराच्या भावाच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब हल्ला

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पराभवानंतर राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेकीची घटना ताजी असताना पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या भावाच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे, हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली.  भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या कार्यालयाच्या दिशेने […]

ताज्याघडामोडी

पडळकरांच्या जीवाला धोका असल्याने सुरक्षा वाढवा, फडणवीसांचं गृहमंत्र्यांना पत्र

विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांना विशेष पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. फडणवीस यांनी या संदर्भातील पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना पाठवले आहे. गोपीचंद पडळकर हे सध्या मुंबईत आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. […]

ताज्याघडामोडी

“काय होतास तू? काय झालास तू?”; देवेंद्र फडणवीसांनी उडवली संजय राऊतांची खिल्ली

भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची आजची बैठक चर्चेचा विषय ठरली ते देवेंद्र फडणवीसांमुळे. त्यांनी आजच्या बैठकीत ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. भ्रष्टाचार, महिला सुरक्षा, अमरावती हिंसाचार अशा अनेक मुद्द्यावर भाष्य करत त्यांनी राज्य सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. याबरोबरच त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनाही टोला लगावत खोचक टीका केली आहे. काय होतास तू काय झालास तू […]

ताज्याघडामोडी

शरद पवारांवर एकेरी भाषेत टीका, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून चंद्रकांत पाटलांना ‘नवरत्न तेलाची बाटली’ गिफ्ट!

पुणे : राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच कलगीतुरे रंगताना पहायला मिळत आहेत. त्यातच सांगली येथे झालेल्या कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली. मात्र या वक्तव्याचा निषेध करत पुण्यातील एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने चंद्रकांत पाटील यांना थेट नवरत्न तेल डोक्याला लावण्यासाठी पाठवले आहे. संदीप काळे असे या कार्यकर्त्यांचे नाव […]

ताज्याघडामोडी

‘शिवसेनेचे १२ आमदार आमच्या संपर्कात, लवकरच सत्ता बदलणार’, भाजप नेत्याच्या वक्यव्याने राजकीय खळबळ

राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि भाजप असा वाद चांगलाच रंगलेला पाहायला मिळतो. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत घरोबा केला असला तरी आता या पक्षांमध्ये फूट पडणार असल्याचा खळबळजनक दावा भाजप नेत्यांकडून करण्यात आलेला आहे. शिवसेनेचे बारा आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपच्या एका नेत्याला केल्यामुळे एकच राजकीय खळबळ उडाली […]

ताज्याघडामोडी

कॉंग्रेसमध्ये नाराज असलेले अमरिंदर सिंग भाजपमध्ये जाणार? दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या भेटीला

नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसच्या अंतर्गत मतभेदावर आणि प्रत्येक राजकीय हालचालीवर भाजपच्या दिल्लीतील नेत्यांची बारीक नजर होती. याचा राजकीय फायदा घेण्यासाठी आतुरलेल्या भाजपने आपला पहिला डाव टाकला असून त्याचाच एक भाग म्हणून आज कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली आहे. गेल्या आठ महिन्यापासून दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा फटका पंजाबमध्ये भाजपला […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भाजप खासदाराला काँग्रेस कार्यकर्त्यांची पाठलाग करून मारहाण

उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील सांगीपूरमधील एका कार्यक्रमावेळी भाजपचे खासदार संगमलाल गुप्ता यांच्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी अक्षरश: गुप्ता यांचा पाठलाग करत त्यांना प्रचंड मारहाण केली. गुप्ता यांना भररस्त्यात पाडून त्यांना लाथाबुक्क्यांनी जोरदार मारहाण केली. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतल्याने हल्लेखोर पळून गेले. दरम्यान, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच ही मारहाण केल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे.  […]

ताज्याघडामोडी

‘मला चंद्रकांत पाटील यांच्याकडून भाजपमध्ये येण्याची ऑफर’, मंत्री हसन मुश्रीफांचा मोठा गौप्यस्फोट

भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 100 कोटींच्या घोटाळ्याच्या केलेल्या आरोपानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन सोमय्यांचे सगळे आरोप फेटाळले आहेत. माझ्याविरोधात सोमय्यांचे आरोप हे भाजपचं षडयंत्र आहे. या सगळ्याचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मास्टरमाईंड आहेत. मला त्रास देण्यासाठी, मला कुठेतरी रोखण्यासाठी हे सगळं सुरु आहे, असं सांगत ‘मला भाजपमध्ये येण्याची […]

ताज्याघडामोडी

भाजपच्या माजी मंत्र्याने घरात गळफास घेऊन केली आत्महत्या

भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी परिवहन मंत्री रजिंदरपाल सिंह भाटिया यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. भाटिया यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  राजनादगांव जिल्ह्यातून खुज्जी विधानसभा मतदारसंघातून रजिंदरपाल सिंह भाटिया तीन वेळ आमदार म्हणून निवडून आले होते. रमन सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये  रजिंदरपाल सिंह भाटिया […]

ताज्याघडामोडी

हसन मुश्रीफांचा घोटाळा दाबण्यासाठी गृहमंत्र्यांकडून मला अटकेचे आदेश- किरीट सोमय्या

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर आरोप करणारे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्यावर पोलिसांना बंदी घातली आहे. यामुळे किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. हसन मुश्रीफ यांचा घोटाळा उघड केल्यानंतर आता आपण विदर्भातील नेत्याचा घोटाळा बाहेर काढणार होतो. शरद पवार यांना हे कळल्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगून माझा […]