ताज्याघडामोडी

असाराम बापू याला जन्मठेप, अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे प्रकरण

असाराम बापू याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सन 2013 मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गांधीनगर सत्र न्यायालयाने ही शिक्षा मंगळवारी (31 जानेवारी) सुनावली. न्यायालाने राखून ठेवलेला निर्णय आज दिला. आसारामच्या एका माजी शिष्याच्या तक्रारीवरुन दाखल झालेल्या गुन्ह्यात ही शिक्षा ठोठावण्यात आली.

आसाराम बापू आणि इतर सहा जणांविरोधात अहमदाबादमधील चांदखेडा पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआर (प्रथम माहिती अहवाल) नोंदविण्यात आला होता. या एफआयआरमध्ये स्वत:ला धर्मगुरु समजणाऱ्या या बापूने 2001 पासून सुरत येथील महिला शिष्यावर अनेक वेळा बलात्कार केला होता. अखेर ती आश्रमातून पळून जाण्यात यशस्वी झाली. तत्पर्वी ती अहमदाबादजवळील मोटेरा येथील बापूच्या आश्रमात राहत होती.

दरम्यान, सत्र न्यायालयाने याच प्रकरणात आसाराम बापू याची पत्नी लक्ष्मीबेन, त्याची मुलगी आणि इतर चार शिष्यांसह इतर सहा आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. या सर्वांवर आसाराम करत असलेल्या गुन्ह्यात मदत आणि प्रोत्साहन दिल्याचा आरोप होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *