ताज्याघडामोडी

फॅबटेकची विद्यार्थिनी उजमा शेखची टेक महिंद्रा या नामांकित कंपनीमध्ये निवड

येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस – कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागातील उजमा शेख या विद्यार्थिनीची टेक महिंद्रा या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे यांनी दिली.

  टेक महिंद्रा हि महिंद्रा ग्रुपचीच एक उपकंपनी आहे. हि कंपनी माहिती तंत्रज्ञान  आणि व्यवसाय प्रक्रियेची  आउटसोर्सिंग सेवा पुरवण्याचे काम करत असून भारतामध्ये १८५ ऑफिस असून  ५५ देशामध्ये  कंपनीचा विस्तार आहे, या निवड प्रक्रिये साठी क्यू स्पायडर या ट्रेनिंग संस्थे मार्फत  ट्रेनिंग दिल्यामुळे  विद्यार्थ्यांना कंपनीसाठी आवश्यक असणारे कौशल्य विकसित झाल्यामुळे विद्यार्थ्यांना निवड प्रक्रिये मध्ये फायदा होत असल्याचे प्लेसमेंट अधिकारी डॉ. साहेबगौडा  संगनगौडर यांनी दिली.

फॅबटेक  अभियांत्रिकी  महाविद्यालय या कोविड – परिस्थितीत विद्यार्थ्यांना अव्वल कंपन्यांमध्ये स्थान देण्यासाठी खूप प्रयत्न करीत आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण  आणि त्यांची कारकीर्द आमच्यासाठी अधिक मूल्यवान आहे. असे संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग  डायरेक्टर . मा. श्री. भाऊसाहेब रुपनर यांनी सांगितले.

निवड झालेल्या या  विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन करून पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक श्री अमित रुपनर  श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर बी. शेंडगे, फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय बैस, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकॉम्युनिकेशन विभाग प्रमुख प्रा. धनश्री राऊत,ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ. साहेबगौडा  संगनगौडर सर्व विभागांचे प्लेसमेंट कॉ-ओर्डीनेटर, सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *