ताज्याघडामोडी

पडळकर हा अज्ञानी बालक, उगवलेले नवीन गवत

 

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा आणखीनच तापताना दिसत आहे. या संदर्भात भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती शोधण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्याचं म्हटलं. त्यावरुन आता राजकीय जुगलबंदी रंगल्याचं पहायला मिळत आहे. विजय वडेट्टीवारयांनी गोपीचंद पडळकरांच्या पत्रावर प्रतिक्रिया देत जोरदार टीका केली आहे.

विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं, पडळकर हा अज्ञानी बालक आहे. आता उगवलेले नवीन गवत आहे. त्याला अजून त्याचं मुळ काय आहे हे कळत नाही. ते कमिटी तयार करण्याचे काम मी केलेय, त्या पडळकरला काय माहिती आहे. अंतिम अहवाल मुख्यमंत्र्यांकडे आहे.. पुढच्या कॅबिनेटमध्ये हा विषय येईल.

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील ओबीसी, भटके विमुक्त यांच्या हक्क-अधिकारांना कायम डावलण्यात आलं आहे. पदोपदी ओबीसींचा अपमान करण्यात आला आहे. हे शासकीय पदांवरील पदोन्नतीमध्ये, एमपीएससीच्या उत्तीर्ण मागासवर्गातील उमेदवारांच्या रखडलेल्या नियुक्त्यांमध्ये, ओबीसींच्या राजकीय आरक्षणबाबत न्यायालयात बाजू मांडतानाचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी मुद्दामहून ‘सेन्सेस डेटा आणि इंपेरिकल डेटा’ यात निर्माण केलेल्या संभ्रमामध्ये, अशा अनेक उदाहरणांवरून स्वच्छपणे दिसून आलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या मनात ओबीसींविषयी असलेला आकस आता लपून राहिलेला नाही. हरवलेली ‘ओबीसी मंत्रीमंडळ उपसमिती’ शोधण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना करण्यात यावी अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *