ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगड मध्ये “वर्ल्ड डिजिटल डिटाॅक्स डे २०२३ साजरा

पंढरपूर: प्रतिनिधी 

एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये गुरुवार दिनांक १४ डिसेंबर २०२३ रोजी “वर्ल्ड डिजिटल डिटाॅक्स डे २०२३” हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

यामध्ये एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकडून ५०० हून अधिक पञ लिहून घेण्यात आली. या पञामध्ये विद्यार्थ्यांनी “वर्ल्ड डिजिटल डिटाॅक्स डे” निमित्त पोस्ट कार्ड जर्नी विथ डिजिटल डिटाॅक्स यांचे महत्व लिहून देशाचे पंतप्रधान मा. श्री.नरेंद्रजी मोदी यांना पाठविण्यात आली.

यामध्ये नागेंद्रकुमार नायकुडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्क्रीन द्वारे “वर्ल्ड डिजिटल डिटाॅक्स डे” महत्व उपस्थित विद्यार्थ्याना समजून सांगितले. यावेळी उपस्थितांनी वर्ल्ड डिजिटल डिटाॅक्स डे या संस्थेची प्रतिज्ञा घेतली. यामध्ये दैनंदिन जीवनातील जास्तीत जास्त वेळ डिजिटल डिटाॅक्सचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले.

या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी, पब्लिकेशन्स डीन डाॅ. संपत देशमुख, डॉ. चेतन पिसे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. अल्ताफ मुलाणी, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. दिपक गानमोटे, 

प्रा. सुभाष पिंगळे, प्रा. अनिल निकम, प्रा. अभिजित सवासे,प्रा. स्वप्ना गोड प्रा. सोनाली घोडके, प्रा. प्रमोद नवले, संगिता कुलकर्णी आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी वर्ग या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेंद्रकुमार नायकुडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डाॅ. संपत देशमुख यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *