गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बाभुळगाव येथील रेणुका कला केंद्र चालकासह ११ ”कला” प्रेमींवर गुन्हा दाखल

 

सोलापुर ग्रामीण जिल्ह्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार फौजदारी प्रकिया संहीता कलम 144 चा अंमल लागु असुन कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रंतिबंधक उपाय योजना म्हणुन पंढरपुर तालुका हद्दीतीतल सर्व आस्थापणा सायंकाळी 4/00 नंतर बंद ठेवणेबाबत आदेश देण्यात आलेले आहेत.या आदेशाचा भंग करत बाभुळगाव हद्दीत पंढरपुर कुर्डवाडी रोडवरील रेणुका सांस्कृतिक कला केंद्र हे निर्धारित वेळेनंतर सुध्दा चालु असल्याची माहिती उपविभागिय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांना मिळाली असता त्यांनी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असता तालुका पोलीस ठाणाच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी जाऊन पाहणी केली.त्यावेळी सदर कला केंद्र सुरु असल्याचे आढळून आले.कला केंद्रामध्ये सुमारे 10-11लोक मास्क न लावता अंतर न ठेवता बसलेले दिसले.

या प्रकरणी  1) विक्रम महादेव चव्हाण (रेणुका सांस्कृतिक कला केंद्राचा मालक) वय 32वर्ष बाभुळगाव ता पंढरपुर 2)रामचंद्र भिष्मा गोरे वय 39वर्ष रा बाभुळगाव ता पंढरपुर 3)बाळासो गोविंद गिड्डे वय 60वर्ष रा अरण ता माढा 4)नागनाथ ज्ञानोबा माळी वय 49वर्ष बाभुळगाव ता पंढरपुर 5)विशाल रामभाऊ काळे वय 23वर्ष रा केज ता केज जि बीड 6) रविंद्र दिंगबर अंधळकर वय 62वर्ष रा लिंकरोड पंढरपुर 7)विठ्ठलराव ज्ञानेश्वर नागटिळक वय 48वर्ष रा कौठाळी ता पंढरपुर 8)मारूती रामचंद्र सांगवीकर वय 48वर्ष रा MIDC नांदेड जि नांदेड 9)गंगाधर गणपत कल्याण वय 52वर्ष रा आनंदनगर नांदेड जि नांदेड 10) दत्ता बाळगर गिरी वय 25वर्ष पिपळगाव कोरका ता नांदेड 11) दाजी बजरंग शिंदे वय 42वर्ष रा सिध्देवाडी ता पंढरपुर यांच्या विरोधात भा.द. वि.क.188, 269,270,34सह आपत्ती व्यवस्थापन2005चे कलम-51(B),साथीचे रोग प्रतिबंध अधिनियम 1897 चे कलम-2,3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *