ताज्याघडामोडी

मे महिन्यात ११ दिवस बँका बंद राहतील; ग्राहकांनी कामाचं नियोजन करावं

मे महिन्यात रमजान ईद, बुद्ध पौर्णिमा आणि भगवान श्री परशुराम जयंती आणि शनिवार, रविवारच्या सुट्टीमुळे बँका ११ दिवस बंद राहणार आहेत.

यामुळे बँकेच्या सुट्टीची तारीख पाहून बँकेच्या कामाचे नियोजन करावे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) मे महिन्याचे सुट्टीचे कॅलेंडर जाहीर केले आहे.

या दिवसात असेल बँकांना सुट्टी

१ मे : रविवार

२ मे : रमजान-ईद

३ मे : भगवान श्री परशुराम जयंती, रमजान-ईद, बसव जयंती, अक्षय तृतीया

८ मे : रविवार

९ मे : रवींद्रनाथ टागोर यांचा जन्मदिन (बंगालमध्ये बँका बंद)

१४ मे : शनिवार

१५ मे : रविवार

१६ मे : बुद्ध पौर्णिमा

२२ मे : रविवार

२८ मे : शनिवार

२९ मे : रविवार

देशभरात मे महिन्यात बँका ११ दिवस बंद राहणार आहेत. दुसरा आणि चौथा शनिवार बँकांना सुट्टी असते, तर इतर दिवशी सण असल्याने बँका बंद असतील. १ मे रविवार, २ मे रमजान ईद आणि ३ मे रोजी अक्षय तृतीया असल्याने बँका सलग ३ दिवस बंद राहणार आहेत.

त्यामुळे बँक ग्राहकांनी बँकेतील कामाचे तसे नियोजन करणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *