गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

महावितरणच्या महिला तंत्रज्ञाचे डोके भिंतीवर आपटले

वीजबिलाची थकबाकी वसुली करणाऱ्या महावितरणच्या कर्मचारी महिलेला शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. एवढेच नाही तर तिचे डोके पकडून भिंतीवर आपटण्यात आले.

यामुळे त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. तुळशीबागेतील माळवी सुवर्णकार मंदिरजवळ ही घटना घडली. प्रारंभी पोलिसांनी हे प्रकरण फारसे गांभीर्याने घेतले नाही. पण, अधिकाऱ्यांकडून दबाव टाकताच कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला.

महाल विभागांतर्गत जुनी शुक्रवारी वितरण केंद्र येथे कार्यरत असणाऱ्या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञ दीपाली खोब्रागडे या 16 सप्टेंबर रोजी वीजबिल थकबाकीच्या वसुलीसाठी गेल्या होत्या. तुळशीबाग रोडवरील माळवी सुवर्णकार मंदिराजवळ राहणारे शंकर बाळाजी किरणापुरे या ग्राहकाकडे जाऊन वीज बिलाची थकबाकीबाबत विचारणा केली. त्यांनी वीज बिलाची थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला. ग्राहकाने आपण वीजबिल भरल्याचे सांगितले.

खोब्रागडे यांनी ग्राहकाकडे वीजबिल भरल्याची पावतीची मागणी केली. वारंवार विचारणा करूनही ग्राहकाने पावती दाखविली नाही. त्याचवेळी घरातील निलेश लहुजी किरणापुरे याने दीपाली खोब्रागडे यांच्यासोबत वाद घातला. शिवीगाळ करीत धक्काबुक्कीही केली. त्यानंतरही दीपाली खोब्रागडे या वीज मीटरकडे जात असताना आरोपी निलेशने त्यांचे हात पकडून खाली ओढले व त्यांचे डोके जोरात भिंतीवर आपटले. त्यामुळे दीपाली खोब्रागडे यांच्या डोक्याला जबर मार लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *