ताज्याघडामोडी

शुक्रवार सकाळपर्यंत दुकाने उघडण्यास परवानगीचे आदेश काढा अन्यथा तहसील कार्यालयासमोर उपोषण 

राज्यात महाविकास आघाडी सरकारने सोमवार सायंकाळी ८ वाजल्यापासून ब्रेक द चेनच्या नावाखाली अघोषित लॉकडाऊन जाहीर केले असून ३० एप्रिल पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचे अचानक आदेश जिल्हाधीकारी सोलापूर यांनी काढल्यामुळे सर्वसामान्य दुकानदार,छोटे व्यवसायिक,रस्त्यावरील पथविक्रेते,खाजगी कामगार यांच्यासमोर मोठे संकट उभा राहिले आहे.शासनाच्या या आदेशाचे पडसाद जसे राज्यात उमटत आहेत तसेच ते पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यात उमटत असून या संतापाची दखल घेत पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार शैला गोडसे या आक्रमक झाल्या असून शुक्रवार सकाळपर्यंत दुकाने उघडण्यास परवानगीचे आदेश नाही काढले तर पंढरपूर तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे शैला गोडसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

    गेल्या तीन दिवसापासून पंढरपूर शहरात दुकाने बंद बाबतच्या आदेशामुळे व्यापारी वर्ग प्रचंड संतप्त झाला आहे.आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पंढपुरात आहेत ते या उद्रेकाची दखल घेत काही तरी निर्णय घेतील अशी अपेक्षा व्यक्त होत होती पण याबाबत ठोस असे काही व्यापाऱ्यांच्या हाती पडले नाही.मात्र आता शहरातील छोटे मोठे व्यवसायिक आणि कामगार यांच्या संतापाची दखल घेत शैला गोडसे यांनी घेतला असून एकीकडे राजकीय नेत्यांच्या बैठकीत हजारो लोक गर्दी करतात मग सामान्य जनतेवर अन्याय का असा प्रश्न शैला गोडसे यांनी उपस्थित केला आहे.       

         

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *