गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मुंबईतील महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार

मुंबई – मुंबईतील सहायक पोलीस निरीक्षक दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्याने, आपल्यावर एका इसमाने बलात्कार केल्याची तक्रार नोंदवली आहे. लग्नाचे आमिष दाखवून या इसमाने आपले लैंगिक शोषण केले, अशी तक्रार तिने पवई पोलिसांकडे केली आहे.

सदर इसमाशी संबंधित अन्य दोन जणांच्या विरोधातही तिने तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्याला धमकावले व ब्लॅकमेलिंग केले असे तिचे म्हणणे आहे. यातील मुख्य आरोपी औरंगाबादचा आहे. तो बॅंकेचा अधिकारी असल्याचे तो सांगतो.

सदर महिली पोलीस अधिकाऱ्याची त्याची सोशल नेटवर्क साईटवर भेट झाली. नंतर त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले. आरोपींनी या महिलेचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ काढले आणि त्या आधारावर तो या महिला पोलीस अधिकाऱ्याला धमकाऊ लागला.

हे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकीही या तीन जणांनी सतत दिली. त्या छळाला कंटाळून सदर महिला अधिकाऱ्याने ही तक्रार दाखल केली आहे. पवई पोलिसांनी बलात्कार व फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *