ताज्याघडामोडी

शिवसेनेच्या माजी जिल्हा उपप्रमुखाची पोलिसांना धमकी व शिवीगाळ 

शिवसेनेच्या माजी जिल्हा उपप्रमुखाची पोलिसांना धमकी व शिवीगाळ 

पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉक डाऊन करण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेला घरातच थांबण्याचे आवाहन करीत आहेत.राज्यात संचार बंदीची अमलबजावणी करण्यासाठी पोलीस प्रशासन अतिशय कठोर पावले उचलत असतानाच या शिवससेनेच्या माजी जिल्हा उपप्रमुख महेश साठे याने पोलीस अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याची फिर्याद पो.कॉ.पंजाब इंद्रजीत सुर्वे यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.  
   या बाबत सविस्तर दाखल फिर्यादीनुसार  दिनांक 24/03/2020 रोजी4/00 वा.च्या सुमारास फिर्यादी पोलीस कर्मचारी सुर्वे यांच्यासह पेट्रोलींग पथक टाकळी रोड परिसरात . वाहनातून कोरोनाबाबत माहीती देवून घराच्याबाहेर न येणे बाबत जनतेस अवाहन करत होतो. आनंद नगर बोर्डाच्या जवळच्या बस स्टंन्ड जवळ मोकळया जागेत तीनचार लहानमुले व दोनतीन इसम फिरत असल्याचे दिसले. त्यावेळी सदर पथक आनंदनगर बोर्डाच्या जवळ गेले असता तेथे फिरत असलेले इसम पळून गेले.यावेळी तेथे वावरणारा महेश साठे नामक इसम पोलीस कर्मचार्यांशी हुज्जत घालत शिवीगाळ करू लागला . त्यावेळी वाहन चालक पोक/मुजावर यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोक/मुजावर यास सुध्दा अर्वाच्य भाशेतबोलून मी अध्यक्ष आहे, तुम्हालाबघून घेईन, तुम्ही मला ओळखत नाही का असे म्हणत उध्दटवर्तनकेले. त्यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी देखील महेश साठे यास समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असताना उध्दटपणे बोलणे चालूच होते.त्यामुळे महेश साठे याच्या विरोधात भा.द.वि.कलम 353,186,188, 504,506 सहमहाराश्ट्र पोलीसकायदा कलम 110/117, 112/117, 135 प्रमाणेफिर्याद दाखल करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *