गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बनावट मृत्यूपत्र व कागदपत्रे तयार करून हडपली जमीन; एकास अटक

वडिलांसह आजीचे बनावट मृत्यू प्रमाणपत्र व कागदपत्रे तयार करुन कोळकी येथील जमिनीची विक्री करुन फिर्यादीची फसवणुक केल्याप्रकरणी एक जणांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी विकास बबन राऊत (रा.306 बुधवार पेठ, फलटण) यांनी फिर्यादी अक्षय अरविंद राऊत (रा. 306 बुधवार पेठ, फलटण) यांच्या वडीलांचे व आजीचे खोटे व बनावट मृत्यु प्रमाणपत्र, खोटे व बनावट कागदपत्रे तयार करुन त्या अनुषंगाने खोटे प्रतिज्ञापत्र तयार करुन फिर्यादीचे वडीलांचे नावावर असलेली मौजे कोळकी येथील अक्षतापार्क जवळील गट नं 37/3 मधील 09. 46 आर क्षेत्र ही जमीन (प्लॉट) तलाठी कार्यालय येथे अर्जासोबत दाखल करुन स्वतःचे नावाने करुन घेतली.

त्यानंतर पुढे प्रविण हणुमंत सत्रे यांना साठे खताने तसेच खरेदी दस्त क्रमांक 502/21 ने मुन्ना जैनुद्दीन शेख यांना साठे खत व दस्त क्रमांक 503/21 ने विक्री करुन फिर्यादी यांची फसवणुक केल्या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात फिर्यादी अक्षय राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संशयित आरोपी विकास बबन राऊत यांस अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहा. पोलिस निरीक्षक सचिन राऊळ करीत आहे.

शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भारत किंद्रे यांनी फलटण शहर पोलिस ठाणे हद्दीतील नागरीकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारे कोणत्याही फसवणुकीचा प्रकार आपल्या बाबतीत घडला असल्यास फलटण शहर पोलीस ठाणेस येवुन तक्रार दाखल करावी. तक्रारीची दखल घेवुन नगरीकांना योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *