ताज्याघडामोडी

एलपीजी गॅस सिलिंडर महागला, पाहा काय आहे नवीन दर

दरमहिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल करतात. १ जून रोजीही व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत ८३ रुपयांनी कमी झाल्यानंतर सर्वसामान्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, यावेळी तेल कंपन्यांनी ४ जुलै रोजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ जाहीर केली असून यावेळी तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरचा दर ७ रुपयांनी वाढवला आहे. विशेष म्हणजे यावेळी १ जुलै रोजी गॅस सिलिंडरच्या किमतीत (घरगुती आणि व्यावसायिक) कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता.

तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत ७ रुपयांनी वाढ केली असून यासह आताराजधानी दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरची किरकोळ किंमत १७७३ रुपयांवरून १७८० इतकी वाढली आहे. दुसरीकडे, घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. विशेष म्हणजे सलग तीन वेळा किमतीत कपात केल्यानंतर व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. एप्रिल, मे आणि जूनमध्ये सिलिंडर दरात कपात झाली होती मात्र, मार्चमध्ये व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत मोठी वाढ झाली.

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या असल्या तरी घरगुती वापरासाठीच्या १४.२ किलो सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. घरगुती सिलिंडरचा भाव अखेरीस १ मार्च २०२३ रोजी झाला आणि ५० रुपयांची कपात करण्यात आली होती. अशाप्रकारे आज आर्थिक राजधानी मुंबईमध्ये १११२.५० रुपये प्रति सिलेंडर उपलब्ध आहे.

गेल्या चार महिन्यांपासून सातत्याने गॅस सिलिंडरच्या दरात कपात करून ग्राहकांना दिलासा देण्यात येत होते. मात्र आजपासून दरात किरकोळ वाढ झाली आहे. १ मार्च रोजी सिलिंडरची किंमत २११९.५० रुपये होती, जो एप्रिलमध्ये २०२८ रुपये, मे मध्ये १८५६.५० रुपये आणि १ जून रोजी १७७३ रुपये झाला. परंतु आता चार महिन्यांनंतर सिलिंडरची किंमत ७ रुपयांनी वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *