ताज्याघडामोडी

देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हिम्मत आसबे यांचा भाजपात प्रवेश 

 

देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हिम्मत आसबे यांचा भाजपात प्रवेश विठल परिवाराच्या स्थापनेपासून महत्वपूर्ण भूमिका बजावणारा मोहरा भाजपच्या गोटात १९९५ पासून विधानसभा निवडणूक असो अथवा विठ्ठल सहकारी साखर कारखाना असो,सहकार शिरोमणी साखर कारखाना असो प्रत्येक निवडणुकीत अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावलेले,विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील १९९० च्या दशकात झालेल्या सत्तांतरात सिहाचा वाटा असलेले उद्योजक हिम्मत आसबे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आज राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केल्याने पंढरपूर शहर व  तालुक्याच्या राजकारणात मोठी चर्चा होताना दिसून येत आहे.२५२ पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ आज देवेंद्र फडणवीस हे सभेसाठी पंढरपुरात आले असता येथील अर्बन बँकेच्या सभागृहात हिम्मत आसबे यांनी भाजपात प्रवेश केला आहे.यावेळी हिम्मत नाना आमच्याकडे आले हि आमच्यासाठी मोठी बाब आहे उद्गार देवेंद्र फडणवीस यांनी काढल्याचे समजते.   

          पंढरपूर शहर व तालुक्यात हिम्मत आसबे यांची ओळख हि एक निवडणूक व्यवस्थापन तज्ञ् अशीच आहे,ते स्वतः थेट निवडणुकीच्या मैदानात कधी उतरले नसले तरी,योग्यवेळी योग्य व्यक्तीशी संपर्क आणी प्रत्यक्ष मतदाना आधीच्या दोन दिवसातील व्यूहरचना यात ते माहीर असल्याचे मानले जाते.आज त्यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे भालके समर्थकांची चिंता वाढणार आहे. 

   देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केल्यानंतर आ.प्रशांत परिचारक व उमेदवार समाधान आवताडे यांनी हिम्मत आसबे यांचे स्वागत केले.या पक्ष प्रवेशाबाबत भूमिका जाणून घेण्यासाठी पंढरी वार्ताने संपर्क श्री आसबे यांच्याशी केला असता,हिम्मत आसबे म्हणाले कि राजकारण हे सर्वसामान्य जनतेच्या,शेतकऱ्यांच्या हिताचे असेल तर त्या पाठीमागे आपण उभे रहायचे या हेतूनेच आपण आज भाजपाला पाठींबा दिला आहे.गेल्या तीन दशकापासून मी पंढरपूर शहर व तालुक्याचे राजकारण अगदी जवळून पाहिले आहे.मला काय कुठली निवडणूक लढवायची नाही ना मला कुठल्या राजकीय पदाची अपेक्षा आहे पण तेच प्रश्न,तेच आश्वासने आणि तेच धोरणे याचा फटका सामान्य जनतेला बसत असताना आपण गप्प राहणे चुकीचे वाटत होते आणि गेल्या वर्षभरात कोरोना काळात सर्वसामान्य जनतेचे झालेले हाल मला उद्विग्न करत गेले म्हणूनच मी भाजपात प्रवेश करण्याच्या निर्णय घेतला आहे. 

        आज देवेंद्र फडणवीस यांनी हिम्मत आसबे पक्ष प्रवेशावेळी स्पष्ट केलेली भूमिका ऐकून समाधान व्यक्त केले असून समाधान आवताडेंच्या विजयासाठी परिश्रम घ्या अशी सूचना केली.यावेळी जितेंद्र भाऊ डोंबे, दिग्विजय आसबे, अजिंक्य आसबे, विक्रांत आसबे आदी उपस्थित होते.                                                                    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *