ताज्याघडामोडी

महिलेने तीन वर्षे स्वतःसह मुलालाही ठेवले घरात कोंडून, कारण ऐकून तुम्हीही व्हाल अवाक्

हरियाणाच्या गुरुग्राममध्ये ३३ वर्षीय मुनमुन मांझी हिने स्वतःसह तिच्या १० वर्षाच्या मुलाला तब्बल तीन वर्षे कोंडून ठेवलं होतं. पोलिसांना याबाबत माहिती मिळाली तेव्हा त्यांनी लागलीच दोघांचीही सुटका केली.महिलेने स्वतःसह मुलाला का कोंडून ठेवलं याबाबत पोलिसांनी विचारलं असता तिने दिलेलं उत्तर अत्यंत धक्कादायक होतं. पुढील वैद्यकीय तपासणीसाठी आता या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

२०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण भारतात सापडला. सुरुवातीला कोरोना भारतात पसरणार नाही असा दावा केला जात होता. परंतु, कोरोना भारतात हातपाय पसरले. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत असंख्य लोकांचा मृत्यू झाला. यामुळे या महिलेच्या मनात कोरोनाविषयी भिती निर्माण झाली. कोरोनापासून आपण लांब राहावं याकरता महिलेने स्वतःसह मुलाला कोंडून ठेवले.

 

मुनमुन मांझी हिच्या पतीने पोलिसांना ही माहिती कळवली होती. सुजान मांझी हे एका खासगी कंपनीत इंजिनिअर असून त्यांना पोलिसांना याबाबत कळवलं. लॉकडाऊन उठल्यानंतरही पत्नीने मुलाला घरात कोंडून ठेवलं आहे. तसंच, लॉकडाऊन उठल्यामुळे मी कामाला जायला सुरुवात केली. परंतु, पत्नीने मला घरात घेतलं नाही. या काळात मांझी खोलीचं भाडं भरत होते. पत्नीला मुख्य गेटपाशी सर्व वाण-सामान आणून देत होते. या काळात पती सुजान मांझी मित्र परिवार आणि नातेवाईकांकडे थांबले. परंतु, पत्नीच्या मनातून कोरोनाची भिती गेली नसल्याने त्यांनी दुसरे घर भाड्याने घेतले.

पतीने याबाबत पोलिसांना कळवलं तेव्हा पोलिसांनाही यावर विश्वास बसला नव्हता. ज्यावेळी त्यांनी मुनमुन मांझी यांना फोन केला तेव्हा मी आणि माझा मुलगा अगदी व्यवस्थित आहोत, असं तिने सांगितलं. पण जेव्हा पोलिसांनी त्या महिलेला व्हिडीओ कॉल केला तेव्हा तिचा मुलगा भावूक झाला होता. त्या मुलाचे केस त्याच्या खांद्यापर्यंत वाढले होते.

 

सात वर्षांचा असल्यापासून हा मुलगा घरात राहत आहे. गेल्या तीन वर्षांत त्याने आपल्या आईव्यतिरिक्त इतर कोणालाही पाहिलं नाही. या तीन वर्षांच्या काळात त्याने आपल्या घरातील भिंतीवर चित्र रंगवले. होते. ज्यावेळी पोलिसांनी घरात प्रवेश केला तेव्हा त्यांना घराची अत्यंत दुर्दशा दिसली. गेल्या तीन वर्षांपासून घरातील कचरा बाहेर फेकण्यात आला नव्हता. वाण-सामानाची पॅकेट्स घरात इतरत्र पसरले होते. घरात कचऱ्याचा ढिग साचला होता. फरशीवर कपडे पडले होते. तसंच, अनेक सामानांवर धुळ साचली होती. मुलाचे केस जवळपास त्याच्या खांद्यापर्यंत वाढले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *